Cyber Crime : ना OTP आला, ना SMS; तरीही निवृत्त पोलिसाच्या खात्यातून काढले 31 लाख

Cyber Crime News : ना OTP आला, ना SMS. बँक खात्यातून सगळेच्या सगळे 31 लाख रुपये गायब झाले. 

Updated: May 29, 2022, 02:18 PM IST
Cyber Crime : ना OTP आला, ना SMS; तरीही निवृत्त पोलिसाच्या खात्यातून काढले 31 लाख title=

नवी दिल्ली : Cyber Crime News : ना OTP आला, ना SMS. बँक खात्यातून सगळेच्या सगळे 31 लाख रुपये गायब झाले. याबाबत सायबर फसवणुकीबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे.  सायबर फसवणुकीची ही घटना नोएडाच्या सायबर पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे. पोलीस खात्यातून निवृत्त झालेले रवींद्र शर्मा यांच्यासोबत ही घटना घडली. 

31 मार्च 2020 रोजी ते पोलीस दलातून रवींद्र शर्मा हे निवृत्त झाले. निवृत्तीच्या वेळी त्यांच्या खात्यात एकूण 31 लाख 10 हजार 490 रुपये होते. त्यांचे बँक खाते उत्तर प्रदेशातील बागपत येथील स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (SBI)आहे. खात्यात जमा झालेली रक्कम नवीन घर बांधण्यासाठी ठेवल्याचे रवींद्र शर्मा यांनी पोलिसांना सांगितले. 

घरात रोकड ठेवल्यास चोरीचा धोका असतो, असा विचार होता. पण आता बँकेतूनही चोरी होऊ शकते, हे त्यांना माहीत नव्हते. त्यांनी आरोप केला की, जेव्हा खात्यातून पैसे काढले गेले तेव्हा बँकेत नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर कोणताही ओटीपी आला नाही.

निवृत्त सरकारी कर्मचारी टार्गेटवर

latest Cyber Crime News : सायबर गुन्ह्याच्या या घटनेत सायबर गुन्हेगाराने रवींद्र शर्मा यांना फोन केला होता. त्यांनी स्वत:ची ओळख कोषागार कार्यालयात नियुक्त कर्मचारी अशी करुन दिली. त्यानंतर त्यांने त्यांची माहिती विचारली.  फोन करताच त्यांनी रवींद्र शर्मा यांची जॉईनिंग डेटपासून रिटायरमेंट आणि कुटुंबाची संपूर्ण माहिती सांगितली. यानंतर खात्यात जमा झालेल्या पैशांची माहितीही देण्यात आली.

हे जाणून रवींद्र शर्मा यांची खात्री पटली. यानंतर सायबर ठगांनी ऑनलाइन व्हेरिफिकेशनच्या नावाखाली बँक तपशील आणि एटीएम कार्डचा तपशील घेतला. या आधारे सायबर ठगांनी एसबीआय मोबाइल अ‍ॅपद्वारे त्यांच्या खात्यातून संपूर्ण 31 लाख 10  हजार490 रुपये काढून घेतले. अशाप्रकारे निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याच्या खात्यात एक रुपयाही शिल्लक राहिला नाही. 

100 पेक्षा जास्त खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर 

पोलिसांच्या प्राथमिक तपासात असे निष्पन्न झाले आहे की, सायबर गुन्हेगारांनी 50 हून अधिक शहरांतील वेगवेगळ्या 100 खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर केले होते. त्यानंतर पोलिसांच्या तपासाची सूत्रे हललीत. अनेक महिने उलटूनही पोलिसांना या सायबर गुन्हेगारांची कोणतीही माहिती मिळालेली नाही.

या संदर्भात उत्तर प्रदेश सायबर क्राइमचे पोलीस अधीक्षक प्रा. त्रिवेणी सिंह यांनी सांगितले की, झारखंडच्या जामतारा येथे राहणारी सायबर गँग अशा घटनांमध्ये सहभागी आहेत. या जामतारा टोळ्या बँक कर्मचाऱ्यांनाही सरकारी खात्यांचे आमिष दाखवून फसवणूक करत आहेत. अशा टोळ्यांबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती मिळाली असून, त्या आधारे त्यांचा शोध सुरु केला आहे.