भरधाव ट्रकची महिलेच्या स्कुटीला टक्कर, भयान अपघाताचा व्हिडीओ अंगावर काटा आणणारा

Viral video : गाडी चालवणं हा काही खेळ नाही. यासाठी आपले कान, डोळे, डोकं याचा चांगल्या प्रकारे वापर करायला हवा. नाहीतर एक चुक आणि खेळ खल्लास.

Updated: Mar 15, 2022, 09:44 AM IST
भरधाव ट्रकची महिलेच्या स्कुटीला टक्कर, भयान अपघाताचा व्हिडीओ अंगावर काटा आणणारा title=

मुंबई : गाडी चालवणं हा काही खेळ नाही. यासाठी आपले कान, डोळे, डोकं याचा चांगल्या प्रकारे वापर करायला हवा. नाहीतर एक चुक आणि खेळ खल्लास. म्हणून तर बऱ्याच ठिकाणी लिहिलं जातं. नजर हटी, दुर्घटना घटी. अशाच काही चुकांमुळे दिवसातून अनेक अपघात घडतात. ज्यामुळे काहींना यामध्ये आपले प्राण गमवायला लागते. तर काहीना गंभीर दुखापत होते. परंतु यामध्ये काही अशी लोकं ही असतात, ज्यांचा मोठा अपघात होऊन देखील, ते त्यातून सुखरुप बचावतात.

सध्या अशाच एका घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये एका महिलेचा मोठा अपघात होतो. परंतु तिचं नशीब इतकं चांगलं आहे की, एकढा मोठा अपघात होऊन देखील या महिलेला जास्त दुखापत झाली नाही.

या अपघाताचा व्हिडीओ जर तुम्ही पाहिलात. तर तुम्हाला त्याच्या समोर या महिलेचं झालेलं नुकसान कमीच असले. परंतु ते काहीही असो. नशीब चांगलं म्हणून ही महिला वाचली, नाहीतर तिचं आज काय झालं असतं, हे काही वेगळं सांगायला नको.

ही घटना पेरामपल्ली परिसरातील आहे. ज्यामध्ये एक महिले स्कुटी घेऊन रस्ता ओलांडताना दिसत आहे. ती स्कूटी घेऊन जात असताना एक वेगाने येणारा ट्रक तिला धडक देतो आणि सरळ निघून जातो. या अपघातानंतर महिला रस्त्याच्या मधोमध पडली. आजूबाजूच्या लोकांनी हा अपघात पाहिल्यानंतर ते घाबरले आणि त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. 

खरंतर यामध्ये रस्ता ओलांडताना महिलेने एकच चूक केली की रस्ता ओलांडताना तिने उजवीकडे न बघता स्कूटी पुढे नेली, ज्यामुळे उजव्या बाजून येणाऱ्या भरधाव मिनी ट्रकला देखील आपली गाडी थांबवता आली नाही. पुढे तो काही मोठं घडेल या भितीने आपला ट्रक तेथे न थांबवता तेथून निघून गेला.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटीझन्स यात चुक कोणाची याबाबत प्रतिक्रिया देत बोलत आहेत. तर काही लोक या महिलेचीच चुकी असल्याचे सांगत आहेत.

३ मार्च रोजी सकाळी साडेआठ वाजता हा अपघात झाला. मणिपाल पोलीस स्टेशनकडून सांगण्यात आलं आहे की, या ट्रक चालकावर कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. हा व्हिडीओ हिट-अँड-रन दिसत असला, तरी या महिलेनं कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही.