सीझनचा सर्वात खतरनाक नागिन डान्स, जमिनीवर लोळत तरुणाचं असं कृत्य, व्हिडीओ व्हायरल

हा तरुण डान्स करण्यात इतका रमला की, त्याला आपल्या आजू-बाजूला कोणीही दिसत नाहीय.

Updated: Jun 5, 2022, 10:25 PM IST
सीझनचा सर्वात खतरनाक नागिन डान्स, जमिनीवर लोळत तरुणाचं असं कृत्य, व्हिडीओ व्हायरल title=

मुंबई : लग्नाचा सीझन सुरु आहे. ज्यामुळा यासंदर्भात अनेक व्हिडीओ आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळतात. हे मजेशीर व्हिडीओ आपलं मनोरंजन देखील करतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जो लग्नातील डान्सचा आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती नागिन डान्स करताना दिसत आहे. खरंतर या व्हिडीओनं सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.  या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती अक्षरंशा जमीनीवर लोळून-लोळून डान्स करत आहे.

हा तरुण डान्स करण्यात इतका रमला की, त्याला आपल्या आजू-बाजूला कोणीही दिसत नाहीय, या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, या व्यक्तीचा डान्स पाहून लोकं स्वत:च घाबरु लागले आहेत आणि स्वत:त्या व्यक्तीपासून लांब पळत आहे.

एवढंच नाही, तर व्हिडीओमध्ये तुम्ही पुढे पाहू शकता की, एक व्यक्ती जवळच खूर्चीवर बसला आहे. परंतु त्याचीही पर्वा न करता हा डान्स करताना व्यक्ती त्या माणसाला आपल्या लाथा मारत आहे.

हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकवर शेअर करण्यात आला आहे. या व्यक्तीच्या अशा वेड्यासारखा डान्समुळेच हा व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रेंड करु लागला आहे. हा व्हिडीओ पोस्ट करताना सीझनमधील सर्वात धोकादायक डान्स असं कॅप्शन देखील देण्यात आलं आहे.

या व्हिडीओवर लोकांकडून वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्सही येत आहेत. दारू प्यायल्यावर अशीच परिस्थिती होते, अशी एका युजरनं प्रतिक्रिया दिली. दुसरीकडे, दुसऱ्या युजरने लिहिले की, हा एक हेवी ड्रायव्हर आहे.