बिहार : चौकाचे नाव ठेवले 'मोदी चौक' तर कापली मान

  बिहारच्या दरभंगामध्ये भाजपच्या नेत्याच्या वडिलांची मान कापल्याचा प्रकार समोर आला आहे.  भाजपचे नेत्याने एका चौकाचे नाव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर 'मोदी चौक' ठेवले होते.  या मुद्द्यावरून खूप वाद झाला होता. भाजपच्या नेत्याचा आरोप आहे की बाईक स्वार ५०-६० जणांनी माझ्या वडिलांची मान कापून हत्या केली.  या गर्दीत त्याच्या भावालाही मारण्याचा प्रयत्न झाला. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी अनेकांना ताब्यात घेतले आहे.  जखमी युवकाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. 

Updated: Mar 16, 2018, 08:38 PM IST
 बिहार : चौकाचे नाव ठेवले 'मोदी चौक' तर कापली मान

पाटणा :  बिहारच्या दरभंगामध्ये भाजपच्या नेत्याच्या वडिलांची मान कापल्याचा प्रकार समोर आला आहे.  भाजपचे नेत्याने एका चौकाचे नाव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर 'मोदी चौक' ठेवले होते.  या मुद्द्यावरून खूप वाद झाला होता. भाजपच्या नेत्याचा आरोप आहे की बाईक स्वार ५०-६० जणांनी माझ्या वडिलांची मान कापून हत्या केली.  या गर्दीत त्याच्या भावालाही मारण्याचा प्रयत्न झाला. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी अनेकांना ताब्यात घेतले आहे.  जखमी युवकाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. 

चौकाचे नाव ठेवले 'मोदी चौक' 

दरभंगाच्या भाजप नेत्याच्या कुटुंबाने आपल्या भागातील एका चौकाला मोदी यांचे नाव दिले. यावरून इतर नेत्यांनी आक्षेप घेतला. रामचंद्र हा युवक भाजपचा स्थानिक नेता आहे. या युवकाने या चौकाला मोदींचे नाव दिले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो ही लावला. 

बाइकस्वारांनी मान कापली...

रामचंद्रने आरोप लावला की  दुसऱ्या पक्षाच्या सुमारे ४० ते ५० जण २५ ते ३० बाईकवर आले आणि हात हॉकी स्टीक आणि तलवारी होत्या. रामचंद्र म्हणाला माझ्या वडील समजावला गेले तेव्हा जमावाने त्यांची मान कापली. तसेच भावालाही मारण्याचा प्रयत्न केला.