नवी दिल्ली : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम पाकिस्तानात असल्याचा खुलासा अनेकदा झाला आहे. परंतू यावेळी त्याचा भावाने स्वतः याबाबत खुलासा केला आहे. इक्बाल कास्कर यांने खुलासा केला आहे की, दाऊद पाकिस्तानातच आहे आणि वेगवेगळ्या शहरांमध्ये त्याचे चार ते पाच घरे आहेत.
ठाणे पोलिसांनी जबरदस्ती वसुलीच्या आरोपाखाली कासकरला अटक केली होती. दाऊद पाकिस्तानमध्ये आपल्या जागा बदलत असतो.
"2003 मध्ये दुबईमध्ये एका ठिकाणी मी दाऊदला भेटलो होतो. दाऊद फोन टॅप होण्याच्या भीतीने भारता नातेवाईकांना फोन करत नाही. असं देखील कासकरने सांगितलं.
इकबालने त्याचा दुसरा भाऊ अनीस अहमदच्या तो संपर्कात असल्याचं म्हटलं आहे. अनीस दाऊदचा संपूर्ण व्यवसाय पाहतो. तो देखील पाकिस्तानात दाऊदसोबत राहतो. ईदच्या दिवशी इकबालने सांगितलं की, अनीसने आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून त्याला फोन केला होता.
कासकर दाऊदला कशा प्रकारे संपर्क करतो. दोघांमध्ये संपर्क करुन देणारा व्यक्ती कोण आहे याबाबत पोलीस कसून चौकशी करत आहे.