हेयर ट्रान्सप्लांट करताय तर सावधान! हेअर ट्रान्सप्लांट केल्याने मृत्यू...

Hair Transplant: जर तुम्ही पण हेअर ट्रान्सप्लांट करण्याचा विचार करत आहात, आणि सोशल मीडिया (Social media) प्लंटफार्मवरील व्हिडीओ पाहून कुठल्याही क्लिकनमध्ये जात असाल तर थांबा...

Updated: Sep 28, 2022, 06:51 PM IST
हेयर ट्रान्सप्लांट करताय तर सावधान! हेअर ट्रान्सप्लांट केल्याने मृत्यू... title=
death after hair transplant and Who can do hair transplant surgery and NMC guidelines nm

Hair Transplant: महिला (woman) असो वा पुरुष (Male) आपण छान दिसावं यावर त्यांचा कल असतो. लांब सडक केस (long Hair) हे महिलांच्या सौंदर्यांत भर घालतात. काही वर्षांपूर्वी आयुष्यमान खुरानाचा (Ayushman Khurana)  बाला (Bala) चित्रपट आठवतो का? त्यात टक्कल असलेल्या पुरुषांना समाजात वावरताना काय समस्या येतात याबद्दल भाष्य करण्यात आलं आहे. अगदी टक्कल असलेल्या तरुणांच्या लग्नात कशी अडचण येतं, हे या चित्रपटात दाखविण्यात आलं आहे.  

जर तुम्ही पण हेअर ट्रान्सप्लांट करण्याचा विचार करत आहात, आणि सोशल मीडिया (Social media) प्लंटफार्मवरील व्हिडीओ पाहून कुठल्याही क्लिकनमध्ये जात असाल तर थांबा...दिल्लीत (Delhi) एका सलूनमध्ये केस प्रत्यारोपणाच्या प्रक्रियेमुळे एका 35 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. काही दिवसांपूर्वी नागपुरातही (Nagpur) बोगस हेअर ट्रान्सप्लांटचं रॅकेट (Hair transplant racket) उघड झालं होते. यात 300 लोकांना लाखो रुपयांचा गंडा घालण्यात आला होता. 

मागील 5 वर्षांमध्ये पटणा (Patna), अहमदाबाद (Ahmedabad), डेहराडून (Dehradun) , मुंबई (Mumbai), दिल्ली (Delhi) आणि चेन्नईमध्ये (Chennai) 6 जणांचा नाहक बळी गेला आहे. कारण तरुण-तरुणींना हेअर ट्रान्सप्लांट करण्याची इतकी घाई असते की, ते संबंधित क्लिनिक (clinic) आणि डॉक्टरची (Doctor) पूर्ण खात्रजमा करत नाही. त्यामुळे ते जीव धोक्यात घालतात. त्यामुळे शेवटी दिल्ली सर्वोच्च न्यायालयाला (Delhi High Court) याची दखल घ्यावी लागली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर नॅशनल मेडिकल कमिशनने (NMC) यांनी यासंदर्भात काही नियमावली जाहीर केली आहे. (death after hair transplant and Who can do hair transplant surgery and NMC guidelines nm)

कोण करु शकतात हेअर ट्रान्सप्लांट सर्जरी? (Who can do hair transplant surgery?)

केस प्रत्यारोणपण को करू शकतं आणि त्यासाठी कोणत्या प्रकारच्या वैद्यकीय पायाभूत सुविधांची आवश्यकता आहे, याबद्दल सांगण्यात आलं आहे . 

- ज्या डॉक्टरांकडे सर्जिकल प्रशिक्षण आहे, रक्त तपासणीचं ज्ञान आहे, याशिवाय डॉक्टर डीएनबी, प्लास्टिक सर्जरी, त्वचाविज्ञानाचा अभ्यास केलेला असावा, विशेषतः केस प्रत्यारोपण हा विषय त्याच्या अभ्यासात गुंतलेला असला पाहिजे. 

- डॉक्टरांकडे केस प्रत्यारोपणाचा पुरेसा अनुभव असायला हवा.

- जेणेकरून टक्कल पडलेल्या डोक्यावर केस वाढू शकतील अशा रुग्णांची निवड करू शकतील.

- कारण सर्व प्रकारच्या टक्कल पडण्यावर हेअर ट्रान्सप्लांट यशस्वी होत नाही.

- शस्त्रक्रियेनंतरही रुग्णाला विशेष काळजी घ्यावी लागते, म्हणून क्लिनिकमध्ये यासंदर्भात सुविधा असाव्यात. 

केस प्रत्यारोपणासारख्या जटिल शस्त्रक्रिया फक्त YouTube वर पाहून किंवा कार्यशाळा घेऊन जे सर्जन करताना त्यांवर या मार्गदर्शकतत्त्वामध्ये जोरदार ताशेरे ओढण्यात आले आहे. 

एवढंच नाही तर ज्या दवाखान्यांमध्ये अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी मूलभूत पायाभूत सुविधा नाहीत, अशांवर कारवाई करण्यात येतं आहे. हेअर ट्रान्सप्लांट अशा क्लिनिकमध्ये करावे जिथे परिचारिका, ऑपरेटर थिएटर टेक्निशियन आणि फार्मासिस्ट विशेष प्रशिक्षित कर्मचार्‍यांसह वैद्यकीय पार्श्वभूमी आहे. याशिवाय लाइफ सपोर्ट आणि आपत्कालीन परिस्थितीशी संबंधित वैद्यकीय उपकरणांसोबतच या शस्त्रक्रियेसाठी एनेस्थेटिक एक्सपर्ट असणेही आवश्यक आहे. जेणेकरून प्रतिकूल परिस्थितीत रुग्णावर योग्य उपचार करता येतील. अशा परिस्थितीत नॅशनल मेडिकल कमिशनने अशा शस्त्रक्रियेसाठी रुग्णालये अधिक चांगली असल्याचे सांगितले आहे. शिवाय एखाद्या क्लिनिकने केस प्रत्यारोपण केल्यास जवळच्या हॉस्पिटलशी संपर्क ठेवणे आवश्यक आहे.

 नॅशनल मेडिकल कमिशनने केस प्रत्यारोपणाच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर (advertisements) कारवाई करण्याबाबतही सांगितले आहे. यासोबतच जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई करण्याचेही सांगण्यात आले आहे. त्यामुळे सोशल मीडियावरील कुठल्याही जाहिराती किंवा अपुऱ्या माहितीशिवाय हेअर ट्रान्सप्लांट करु नका.