भारतासोबतच जगभरातल्या श्रीमंत व्यक्तींना मागे टाकत, गौतम अदानींनी (Gautam Adani) मारली बाजी

Gautam Adani : गौतम अदानी यांच्या नावे नुकतीच एका विक्रमाची नोंद झाली आहे.

Updated: Aug 30, 2022, 11:16 AM IST
भारतासोबतच जगभरातल्या श्रीमंत व्यक्तींना मागे टाकत, गौतम अदानींनी (Gautam Adani) मारली बाजी title=

Gautam Adani : मागील काही दिवसांपासून भारतीय बाजारपेठेत बरीच उलथापालथ पाहायला मिळत आहे. एकाएकी अदानींनी बरेच मोठे करार केल्यामुळं व्यवसाय क्षेत्रात त्यांच्या नावाची बरीच चर्चा सुरु आहे. किंबहुना त्यांच्यावर कर्ज असल्याच्याही बऱ्याच चर्चा पाहायला मिळाल्या. पण, ते सर्व मागे टाकत अदानी यांच्या नावे नुकतीच एका विक्रमाची नोंद झाली आहे.

जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी गौतम अदानी यांनी तिसऱ्या क्रमांक पटकवला आहे. (Elon musk) एलन मस्क आणि जेफ बेजोस या दोघांनंतर तिसरं नाव आहे ते गौतम अदानी (Gautam Adani) यांचं. गौतम अदानी यांनी LVMH मोएट हेनेसी लुई वुइटनचे सह-संस्थापक, फ्रेश बिझनेस मॅग्नेट बनॉर्ड अरनॉल्ड (Bernard Arnault) यांना देखील श्रीमंतीमध्ये मागे टाकलं आहे.

गौतम अदानी यांची 137 बिलियन डॉलर इतकी एकूण संपत्ती आहे. 60 वर्षीय बिझनेस टाइकून (Business Tycoon) या प्रतिष्ठित यादीत तिसऱ्या स्थानावर आहेत. एलन मस्क (Elon musk) आणि जेफ बेजोस (Jeff Bezos) यांच्यामागोमागच त्यांचं नाव आहे.
 
टेस्लाचे सर्वेसर्वा एलन मस्क हे 251 बिलियन डॉलर संपत्तीचे मालक आहेत. तर, अमॅझोनचे (Amazon) संस्थापक आणि सीईओ जेफ बेजोफ (Jeff Bezos) एकूण 153 बिलियन डॉलर इतकी संपत्ती आहे.

अदानींनी गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या कोल टू पोर्ट्स (Coal to Ports) समूहाचा विस्तार करताना डेटा सेंटर (Data Center), सिमेंट (Cement), मीडिया (Media) आणि अॅल्यूमिना बंदर (Ports) आणि विमानतळ व्यवस्थापन (Airport Management), गॅस वितरण, वीज निर्मिती (Electricity Generation), अशा अनेक उद्योगांमध्ये कामगिरी केली आहे. मागच्या महिन्यात मायक्रोसॉफ्टचे (Microsoft Corporation) सह-संस्थापक  बिल गेट्स (Bill Gates) यांना मागे टाकत जगातील चौथे श्रीमंत व्यक्ती बनले होते.

अंबानींचं कितवं स्थान ?

ब्लूमबर्ग बिलिनिअर इंडेक्सनुसार (Bloomberg Billionaires Index), मुकेश अंबानी (Mukesh Ambani) हे जगभरातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये अकराव्या स्थानी आहेत. मुकेश अंबानी यांची एकुण संपत्ती 91.9 बिलियन डॉलर आहे.

(फोटो : ब्लूमबर्ग वेबसाईट)