मुंबई : सोशल मीडियावर झटपट प्रसिद्ध होण्यासाठी अनेकजण आपले व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. असाच एक व्हिडिओ बनवताना एका तरूणाला नोएडा पोलीस स्टेशन सेक्टर-113 च्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या संदर्भातला व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली.
नोएडाच्या गौतम बुद्ध नगर येथील सोरखा गावात राहणाऱ्या २१ वर्षीय राजीव हा इन्स्टाग्रामसाठी व्हिडिओ बनवत होता. राजीवने अजय देवगनच्या गोलमाल सिनेमासारखं दोन फॉर्च्युनर कारच्या बोनेटवर पाय टाकून स्टंट करतानाचा त्याने व्हिडिओ बनवला होता. यानंतर या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ही बाब पोलिसांच्या निदर्शनास आली. यानंतर सेक्टर-113 पोलिस स्टेशनच्या पोलिसांनी कारवाई केली.
गाड़ियों व बाइक पर खतरनाक स्टंट करने वाले युवक को थाना सेक्टर-113 नोएडा पुलिस द्वारा गिरफ्तार कर स्टंट में प्रयुक्त वाहनों को सीज किया गया।#UPPolice pic.twitter.com/92yYu33O45
— POLICE COMMISSIONERATE GAUTAM BUDDH NAGAR (@noidapolice) May 22, 2022
व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी तरूणाचा शोध घेतला. राजीव असे या तरूणाचे नाव असून तो सोरखा गावचा रहिवासी आहे. त्याला आता अटक करण्यात आली आहे. तसेच व्हिडिओ बनवण्यासाठी वापरण्यात आलेल्या दोन एसयूव्ही आणि एक मोटारसायकल जप्त करण्यात आल्याची माहिती एसएचओ सेक्टर-113 चे शरद कांत यांनी दिली.