मोठी बातमी! दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरावर हल्ला

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया (Manish Sisodia) यांनी ट्विट करुन ही माहिती दिली.

Updated: Mar 30, 2022, 02:44 PM IST
मोठी बातमी! दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरावर हल्ला title=

नवी दिल्ली  : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Delhi CM Arvind Kejriwal) यांच्या घरावर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया (Manish Sisodia) यांनी ट्विट करुन ही माहिती दिली.

भारतीय जनता पक्षाच्या (BJP) युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घराच्या गेटवर भगवा रंग लावून निदर्शनं केली. BJYM कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी दिल्ली पोलिसांनी पाण्याचा मारा केला.
 
काश्मिरी पंडितांवरील वक्तव्याचा निषेध
मुख्यमंत्री केजरीवाल यांनी काश्मिरी पंडिंताबद्दल केलेल्या वक्तव्याचा विरोध भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते करत होते.  या निदर्शनात तेजस्वी सूर्या, चहल, वैभव सिंग यांच्यासह दिल्ली प्रदेश युवा मोर्चाचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री सिसोदिया यांचा भाजपवर आरोप
या निदर्शनाबद्दल दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी ट्विट करून भाजपवर निशाणा साधला आहे. भाजपच्या गुंडांनी केजरीवाल यांच्या घराची तोडफोड केली आहे. पोलिसा या गुंडांना रोखण्याऐवजी केजरीवालांच्या घरापर्यंत घेऊन गेली, असा आरोपही सिसोदिया यांनी केला आहे