मोठी बातमी । पॅन - आधार लिंक नसेल तर दंड होणार, कालांतराने हा दंड दुप्पट

PAN - Aadhar Card Link : तुम्ही जर पॅन - आधार कार्ड लिंक केलं नसेल तर तुमच्या हातात आज आणि उद्याचा दिवस आहे. 

Updated: Mar 30, 2022, 03:36 PM IST
मोठी बातमी । पॅन - आधार लिंक नसेल तर दंड होणार, कालांतराने हा दंड दुप्पट   title=

मुंबई : PAN - Aadhar Card Link : तुम्ही जर पॅन - आधार कार्ड लिंक केलं नसेल तर तुमच्या हातात आज आणि उद्याचा दिवस आहे. त्यामुळे लवकरच पॅन-आधारला लिंक करून घ्या. कारण, 1 एप्रिलनंतर पॅन - आधार कार्डला लिंक करायचं असेल तर तुम्हाला 500 रुपये मोजावे लागतील. हा दंड पुढील तीन महिने असेल. त्यानंतर म्हणजेच जूननंतर पॅन-आधार लिंक करण्यासाठी 1 हजार रुपये मोजावे लागतील. त्यामुळे हा दंड भरण्यापेक्षा दोन मिनिटांत तुम्ही आधार लिंक करून घ्या. 

पॅन आणि आधार लिंक करण्यासाठी फक्त दोन दिवस उरले आहे. केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार 31 मार्चपर्यंत पॅन आणि आधार लिंक करता येणार आहे. 2017 मध्ये पॅन आधार लिंक करण्याची प्रक्रिया सुरु झाली. तेव्हापासून अनेकदा ही कालमर्यादा वाढवण्यात आली आहे. आता 31 एप्रिलपर्यंत मात्र ही डेडलाईन वाढवली जाण्याची शक्यता फारच कमी आहे.

या लोकांच्या अडचणी वाढणार

प्रामुख्याने ज्या एनआरआय लोकांकडे पॅन आहे. पण आधार कार्ड काढणे कायद्यात बसत नाही, अशांसाठी ही प्रक्रिया फारच जिकीरीची होणार आहे. एनआरआय जर भविष्यात भारतात आले आणि त्यांची बँक खाती एनआरओ प्रकारची नसतील, तर त्यांच्या सामान्य खात्यातील रकमांचे व्यवहार ठप्प होतील.

पॅन - आधार कार्ड लिंक करण्यासाठी

Pan-Aadhar ला कसे कराल ऑनलाईन लिंक : आधार पॅनला एसएमएसद्वारे लिंक करण्यासाठी 567678 किंवा 56161 वर SMS एसएमएस पाठवावा लागेल. याचा एक फॉरमॅट निश्चित केला आहे यूआयडीएपीएन (१२ अंकी-आधार क्रमांक) स्पेस (१० अंकी पॅन नंबर) लिहून एसएमएस SMS करावा. एखाद्याचा आधार कार्ड नंबर  ABCD12345678 आहे व  पॅन कार्ड क्रमांक  XYZ12345645 आहे. तर एसएमएस SMS  करताना हा फॉरमॅट "ABCD12345678 WXYZ123456" असा  असेल. किंवा https://eportal.incometax.gov.in/iec/foservices/#/pre-login/bl-link-aadhaar या लिंकवर क्लिक करून आधार पॅनला लिंक करू शकता.