मोठी बातमी | SpiceJet विमानाचं इमरजन्सी लँडिंग, धुराने कोंडला प्रवाशांचा श्वास

टेक ऑफनंतर 5000 फूट उंचावर गेल्यानंतर हा प्रकार घडला. स्पाईसजेट कंपनीचं हे विमान होतं. सुदैवानं मोठी दुर्घटना टळली. 

Updated: Jul 2, 2022, 09:56 AM IST
मोठी बातमी | SpiceJet विमानाचं इमरजन्सी लँडिंग, धुराने कोंडला प्रवाशांचा श्वास title=

मुंबई : दिल्लीहून जबलपूरला जाणाऱ्या विमानाचं अचानक इमरजन्सी लॅडिंग करण्यात आलं. विमानात अचानक धूर निघत असल्यानं विमान दिल्ली एअरपोर्टवर खाली उतरवावं लागलं. धूर विमानात पसरल्यानं प्रवाशांना त्रास सहण कारावा लागला. प्रवाशांना यामुळे त्रास होत होता. 
 
विमानाचं तत्काळ लँडिंग करण्यात आलं. त्यामुळे मोठा धोका टळला. त्यामुळं प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला. तर विमानात नेमकी ही आग कुठे आणि कशामुळे लागली याची चौकशी करण्यात येणार आहे. 

टेक ऑफनंतर 5000 फूट उंचावर गेल्यानंतर हा प्रकार घडला. स्पाईसजेट कंपनीचं हे विमान होतं. सुदैवानं मोठी दुर्घटना टळली. त्याआधीच तत्काळ लँडिंग करून प्रवाशांना सुखरुप विमानातून उतरवण्यात आलं. त्याचा व्हिडीओ समोर आला आहे. हा धूर कशामुळे येत होता याची माहिती अजून समोर आली नाही.