मुख्यमंत्री देवेंद्र फडणीवसांनी अटलजींसोबतची 'आठवण' शेअर केली

भारताचे माजी पंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी यांचे गुरुवारी दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झाले.

Updated: Aug 16, 2018, 07:40 PM IST
मुख्यमंत्री देवेंद्र फडणीवसांनी अटलजींसोबतची 'आठवण' शेअर केली title=

नवी दिल्ली : भारताचे माजी पंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी यांचे गुरुवारी दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झाले. 5 वाजून 5 मिनिटांनी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. वाजपेयी हे 93 वर्षांचे होते. ११ जूनपासून अटल बिहारी वाजपेयी एम्स रुग्णालयात होते. पण मागच्या ४८ तासांपासून त्यांची प्रकृती आणखी खालावली होती. प्रकृती खालावल्यामुळे बुधवारपासून त्यांना जीवनरक्षक प्रणालीवर (व्हेंटिलेटरवर) ठेवण्यात आले होते. अटल बिहारी वाजपेयी यांना डिमेंशिया नावाच्या आजाराने ग्रासले होते. २००९ पासून ते व्हिलचेअरवर होते. ११ जूनला किडनीच्या संसर्गामुळे त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून त्यांची प्रकृती सातत्याने ढासळत गेली.

अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या बरोबरच एक जुना फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. लहानपणापासूनच माझ्या अटलजींबद्दलच्या अनेक आठवणी आहेत. भाजपच्या बैठकीदरम्यान अटलजी आणि प्रमोद महाजन यांच्यासोबतची माझी पहिली भेट. यानंतर कायमच त्यांनी मला मार्गदर्शन केलं.... असं ट्विट फडणवीस यांनी केलं आहे.