खुशखबर! या तारखेपासून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होणार

परदेशात प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, मंत्रालयाकडून आली आंतरराष्ट्रीय विमानसेवेबाबत मोठी अपडेट

Updated: Mar 8, 2022, 07:14 PM IST
खुशखबर! या तारखेपासून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होणार title=

नवी दिल्ली : परदेशात प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आंतरराष्ट्रीय विमानसेवा पुन्हा सुरू करण्यात येत आहे. एव्हिएशन रेग्युलेटरी डीजीसीएने दिलेल्या माहितीनुसार, 27 मार्चपासून भारतातून येणाऱ्या आणि जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय व्यावसायिक प्रवासी विमानसेवा पुन्हा सुरू करण्यात येणार आहेत. 

यापूर्वी 19 जानेवारी रोजी या विमानांच्या निलंबनाची मुदत 28 फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आली होती. मात्र आता विमानसेवा सुरू करण्याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. लसीकरण आणि कोरोना नियंत्रणात आल्याने आता मोठा निर्णय घेण्यात आला आहे. 

कोरोनामुळे भारतात 2 वर्षांपासून बंद असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानसेवा पुन्हा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली. दोन वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय उड्डाणांवरील बंदी उठवण्यात आली. 

कोरोनामुळे आंतरराष्ट्रीय विमानसेवेला मोठा फटका बसला होता. 23 मार्च 2020 पासून आंतरराष्ट्रीय विमान सेवा रद्द करण्यात आली होती. जुलै 2020 मध्ये भारत आणि इतर 45 देशांमध्ये एअर बबल व्यवस्था तयार करून विशेष विमानसेवा सुरू करण्यात आली आहे. मात्र पूर्ण क्षमतेनं विमानसेवा मार्च अखेरपर्यंत सुरू करण्यात येणार आहे. 

मंत्रालयाकडून मोठी माहिती
नागरिक उड्डयन मंत्रालयाकडून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्याबाबत मोठी माहिती समोर आली आहे. जगात लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे नागरिकांचं हित लक्षत घेऊन 27 मार्च 2022 पासून विमानसेवेचं समर शेड्युल 2022 सुरू करण्यात येईल. त्यामुळे नागरिकांना लवकरच त्याबाबतच्या गाइडलाईन्सही देण्यात येणार आहेत. 

DGCA चा मोठा निर्णय
कोरोनामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिव्हिल एव्हिएशन मंत्रालय आणि DGCA यांना विमानसेवा स्थगित करण्याच्या सूचना दिल्या होत्या. 1 सप्टेंबर 2021 पासून 26 नोव्हेंबरपर्यंत ही सेवा रद्द करण्यात आली होती. त्यानंतर विमानसेवा कधी सुरू होईल याबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. मात्र आता पुन्हा एकदा विमानसेवा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.