मिळेल सोन्याहून अधिक किंमत... यंदाच्या धनत्रयोदशीला खरेदी करा '99.5% शुद्ध सोनं' पण दागिने नाही तर...

Gold Buying On Dhanteras 2024: धनत्रयोदशीला सोनं खरेदी कऱण्याची भारतीयांची परंपरा आहे. पण सोनं नेमकं कोणतं खरेदी करावं, असा प्रश्न पडतो.

मानसी क्षीरसागर | Updated: Oct 28, 2024, 12:00 PM IST
मिळेल सोन्याहून अधिक किंमत... यंदाच्या धनत्रयोदशीला खरेदी करा '99.5% शुद्ध सोनं' पण दागिने नाही तर... title=
Dhanteras 2024 Gold Buying tips physical gold vs gold etf 995 percent purity

Gold Buying On Dhanteras 2024: धनत्रयोदशी 29 ऑक्टोबर रोजी आहे. या दिवशी सोनं-चांदी खरेदी कऱणे शुभ मानलं जातं. असं म्हणतात की, यामुळं घरात सुख शांती व समृद्धी येते. या कारणामुळं भारतीय या दिवसांत सोनं खरेदी करतात. सोन्याचे दागिने 14, 18 आणि 22 कॅरेटमध्ये तयार होतात. तुम्ही 22 कॅरेटचे दागिने खरेदी केले तरी त्यात तुम्हाला जास्तीत जास्त 91.6 टक्के शुद्ध सोनं मिळते. पण तुम्हाला तर गुंतवणुक म्हणून धनत्रयोदशीला सोनं खरेदी करायचं आहे तर 99.5 टक्के शुद्धतेची खात्री असलेलेच सोनं खरेदी करा. 

गोल्ड ईटीएफ (Exchange Traded Funds)  म्युच्युअल फंडचाच एक गुंतवणुकीचा पर्याय आहे. जे सोन्याच्या भावात होणाऱ्या चढ-उतारानुसार भाव अधारित होत असतात. तुम्हालादेखील सोन्यात गुंतवणुक करायची असेल तर हा पर्याय चांगला आहे. गोल्ड ETF ची खरेदी-विक्री शेअर्सप्रमाणे BSE आणि NSEप्रमाणे केली जाते. मात्र, यात तुम्हाला सोनं मिळत नाही तर सोन्याचा सध्या जो भाव आहे त्यानुसार पैसे मिळतात. गुंतवणुक म्हणून फिजिकल गोल्डच्या तुलनेत चांगला पर्याय ठरु शकतो.

काय आहे गोल्ड ETFचे फायदे

शुद्धतेची गँरटी

गोल्ड ETFमधून खरेदी करण्यात आलेलं सोनं 99.9 टक्के शुद्धतेप्रमाणेच आहे. याशिवाय, शेअर बाजारातील थेट गुंतवणुकीपेक्षा ईटीएफमधील गुंतवणूक कमी अस्थिर असते.

मेकिंग खर्चाची बचत होते

जर तुम्ही ज्वेलर्समध्ये दागिने खरेदी करण्यासाठी जाल तर तुम्हाला तिथे मेकिंग चार्जेसचे अतिरिक्त पैसे द्यावे लागतात. ज्यामुळं सोनं अधिक महाग होते. मात्र, गोल्ड ईटीएफमध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचे मेकिंग चार्ज द्यावे लागत नाहीत. गोल्ड ETFमध्ये 1 टक्के किंवा त्यापेक्षा कमी ब्रोकरेज लागते. तसंच, पोर्टफोलियो मॅनेज करण्यासाठी वर्षाभरात 1 टक्के चार्ज द्यावा लागतो. मात्र ही रक्कम मेकिंग चार्जपेक्षा कमी आहे. 

सुरक्षिततेची हमी

जर तुम्ही फिजिकल गोल्ड खरेदी करत आहात तर सोनं सुरक्षित कुठे ठेवावे असा प्रश्न पडतो. पण ETFमध्ये तुम्हाला दागिने कुठे ठेवावे याची काळजी करावी लागत नाही. तुम्ही इलेक्ट्रॉनिक सोने डिमॅट खात्यात जसे शेअर्समध्ये ठेवता, ज्यासाठी वार्षिक डीमॅट शुल्क भरावे लागते.

गोल्ड ETFमध्ये गुंतवणूक कशी करावी?

जर तुम्हाला गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला आधी डिमॅट खाते उघडावे लागेल. यामध्ये, तुम्ही NSE वर उपलब्ध गोल्ड ETF चे युनिट्स खरेदी करू शकता आणि तुमच्या डीमॅट खात्याशी जोडलेल्या बँक खात्यातून तितकीच रक्कम कापली जाईल. एक किंवा दोन दिवसांनंतर, तुमच्या खात्यात गोल्ड ईटीएफ जमा केले जातील. हे फक्त ट्रेडिंग खात्याद्वारे विकले जाते.

(Disclaimer : तुम्ही अशाप्रकार कोणत्याही पद्धतीची गुंतवणूक करु इच्छित असाल तर सर्वात आधी सर्टिफाइड गुंतवणुकदार सल्लागारांचा सल्ला घ्यावा. तुम्हाला कोणताही नफा किंवा तोटा झाल्यास झी 24 तास जबाबदार राहणार नाही.)