नवी दिल्ली : देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. रुग्ण्यांची वाढती संख्या लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात लॉकडाऊनची घोषणा केली. गेल्या दोन महिन्यांपासून देशात लॉकडाऊन आहे. पण सद्य स्थितीत लॉकडाऊनचे काही नियम शिथिल करण्यात आले आहेत. सांगायचं झालं तर येत्या काही दिवसांमध्ये देशातील सर्वच विमानतळांवरील विमानसेवा सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशात कोरोना व्हायरसचा प्रदुर्भाव होवू नये याकरता नवीन नियम लागू करण्यात आले आहेत.
केंद्र सरकारने याच पार्श्वभूमीवर काही नवीन अटी आणि शर्ती लागू केल्या आहेत. यामध्ये विमानातील मधल्या आसन व्यवस्था रिकाम्या ठेवण्याचे आदेश नागरी उड्डाण संचालनालयाने (DGCA)देशांतर्गत विमान कंपन्या दिले आहेत. जर प्रवाशांची संख्या जास्त असेल तर मधल्या आसनावर बसलेल्या प्रवाशास वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या मानकांनुसार तयार करण्यात आलेला गाऊन द्यावा. शिवाय मास्क फेस शिल्ड देण्यात यावा.
सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे आसन व्यवस्थेच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. प्रवाशांचे आरोग्य आणि सुरक्षिततेच्या हितासाठी नागरी उड्डयन महासंचालनालयाकडे (डीजीसीए) सर्व निर्णय घेण्याचे हक्क असतील असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने २५ मे रोजी झालेल्या सुनावणी दरम्यान दिला आहे.
त्याचप्रमाणे प्रवासा दरम्यान कुटुंबातील सदस्यांना एकत्र बसण्याची परवानगी असू शकते. या आदेशानुसार विमान कंपन्या प्रत्येक प्रवाशाला सेफ्टी किट देईल. ज्यामध्ये सर्जिकल मास्क, फेस शील्ड तसेच पुरेशा प्रमाणात सॅनिटायझरचा समावेश असेल.