नवी दिल्ली : बीएसईएस (BSES) ग्राहकांवर पेटीएम (Paytm) चांगलेच खूश झाले आहे. पेटीएम आपल्या ग्राहकांना चक्क एक वर्षासाठी एक लाख रुपयांचा अपघाती विमा देणार आहे. मात्र, त्यासाठी अट इतकीच असेल की बीएसईएस ग्राहकांना आपले विजबील ई-वॉलेट पेटीएमच्या माध्यमातून किमान तीन महिने सलग भरावे लागेल.
कंपनीच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, बीएसईएस राजधानी पॉवर लिमिटेड आणि बीएसईएस यमुना पॉवर लिमिटेडच्या सुमारे 40 लाख ग्राहकांना ही सुविधा मिळणार आहे. ही योजना ऑगस्ट 2018 पर्यंत लागू असणार असेल. ज्या ग्राहकांनी मे, जून आणि जुलै 2017मध्ये आपल्या विज बिलाचा भरणा पेटीएमच्या माध्यमातून केला असेल त्या ग्राहकांनाही ही योजना लागू राहील.
काही दिवसांपूर्वीच पेटीएम एक हटके प्लान घेऊन आले होते. ज्यात कंपनीच्या वतीने ग्राहकांना ‘डिजिटल सुवर्ण’ आणी तेही कॅशबॅकच्या स्वरूपात दिले जात होते. मोबाईल वॉलेट कंपनी पेटीएम आता याच धरतीवर आर्थिक घेवाणदेवाण करण्यासाठी कॅशबॅकच्या रूपात ग्राहकांना ‘डिजिटल सुवर्ण’चा पर्याय उपलब्ध करून देणार आहे.
कंपनीने दिलेल्या एका प्रतिक्रियेत म्हटले आहे की, आमची योजना भारतीयांना खर्च आणि बचत अशा दोन्ही अनुभवांना एकत्र जोडेन. तसेही, सोने आणि भारतीय नागरिकांचे मन यांचे नाते फार जवळचे आहे. या वर्षाच्या सुरूवातीलाच पेटीएमने सुवर्ण शुद्धीकरण करणारी कंपनी एमएमटीसी-पीएएमपीसोबत भागिदारी केली होती. ज्यात ग्राहकांना एक रूपयातह सोने खरेदी करता येते.