धक्कादायक! लस घेण्यासाठी विरोध केला म्हणून नोकरीवरून काढलं

7वा वेतन आयोग घेणाऱ्यासाठी महत्त्वाची बातमी, लस घेण्यासाठी विरोध कराल तर नोकरी गमवाल

Updated: Aug 13, 2021, 09:50 PM IST
धक्कादायक! लस घेण्यासाठी विरोध केला म्हणून नोकरीवरून काढलं title=

अहमदाबाद: तुम्ही जर अजूनही कोरोनाची लस घेतली नसेल किंवा काय फरक पडतो नको घेऊया अशा विचारात असाल तर थांबा. तुम्ही लगेच हा विचार काढून टाका. कारण लस घेण्यासाठी विरोध केल्यानं चक्क एकाला आपली नोकरी गमवावी लागली. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणती छोटी नाही तर सरकारी नोकरी गमवण्याची वेळ आली. त्यामुळे तुमच्यावर जर ही वेळ येऊ नये असं वाटत असेल तर लस घ्या.

नेमकं काय प्रकरण?

भारतीय वायूसेनेत काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने कोरोनाची लस घेण्याचा विरोध केला. त्याची किंमत म्हणून या कर्मचाऱ्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आलं.हे प्रकरण कोर्टात गेल्यानंतर यासंदर्भातील माहिती समोर आली आहे. वायूसेनेच्या कर्मचाऱ्यांना लसीकरण बंधनकारक असल्याचं नमुद केलं होतं. त्यामुळे यासाठी विरोध केल्याने त्याला नोकरीवरून काढण्यात आलं आहे. 

हे प्रकरण कोर्टात गेलं त्यावेळी न्यायधीश ए जे देसाई आणि ए पी ठाकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार पूर्ण भारतात 9 कर्मचाऱ्यांनी लस घेण्यासाठी विरोध केला. त्या सर्वांना नोटीस पाठवण्यात आली. यासाठी इतर 8 जणांनी नोटीसला उत्तर दिले मात्र एका कर्मचाऱ्याने उत्तर देण्याचीही तसदी घेतली नाही. हवाईदलात काम करणाऱ्या प्रत्येकासाठी लस घेणं बंधनकारक करण्यात आलं आहे. 

असं असतानाही एका कर्मचाऱ्याने नोटीसला उत्तर दिलं नाही. त्यामुळे त्याला कामावरून काढण्याचा निर्णय घेण्यात आला. या प्रकरणी कर्मचाऱ्याने न्यायासाठी कोर्टात धाव घेतली. या प्रकरणाची दखल घेऊन कोर्टाने हवाई दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पुन्हा एकदा या बडतर्फच्या निर्णयावर विचार करण्यासाठी अवधी कोर्टानं दिला होता. या प्रकरणात कोर्टाने बडतर्फ केलेल्या कर्मचाऱ्याला अंतरिम दिलासा दिला आहे. तर हवाई विभागातील वरिष्ठांना अंतिम निर्णय कळवण्यासाठी मूदत दिली आहे. 

अशा प्रकारचा नियम हा हवाई दलाव्यतिरीक्त अजून सरकारी इतर सरकारी कर्मचाऱ्यासाठीही एवढाच धोक्याचा असणार का याबाबत सध्या तरी कोणतंही स्पष्टीकरण आलेलं नाही. मात्र कोरोनाची लस न घेतल्यास येत्या काळात असे काही प्रकार घडू नयेत यासाठी कर्मचारी आणि नागरिकांनी काळजी घेणं गरजेचं आहे.