आधारकार्डची झेरॉक्स देण्याआधी ही बातमी वाचाच, नाहीतर अडचणीत याल

आधार कार्ड किंवा त्याची झेरॉक्स दिली तर तुमची फसवणूक होऊ शकते, केंद्राने यासंदर्भात सावधानतेचा इशारा दिला.

Updated: May 29, 2022, 02:55 PM IST
आधारकार्डची झेरॉक्स देण्याआधी ही बातमी वाचाच, नाहीतर अडचणीत याल title=

मुंबई : आपण कोणत्याही ठिकाणी ओळखपत्र जोडायचं म्हटलं की पटकन आधारकार्ड दिलं जातं. आधारकार्डची झेरॉक्स काढून अगदी सहज दिली जाते. ओळखपत्र म्हणून आधार कार्ड न देण्याचं आवाहन केंद्रसरकारने केलं आहे. 

आधार कार्ड किंवा त्याची झेरॉक्स दिली तर तुमची फसवणूक होऊ शकते, केंद्राने यासंदर्भात सावधानतेचा इशारा दिला. आधार कार्डचा संपूर्ण नंबर दिसणारी कॉपी न देता मास्क आधारचा वापर करावा, असं सरकारनं म्हटलं आहे. 

मास्क आधार कार्डवर नंबरचे शेवटचे चार अंकच दिसतात त्यामुळे हे कार्ड सेफ आहे. तुम्ही मास्क आधार कार्ड ऑनलाईन डाऊनलोड करू शकता असंही केंद्र सरकारनं म्हटलं आहे. 

तुमच्या आधारकार्डचा कोणीही गैरवापर करू नये असं वाटत असेल तर याकडे दुर्लक्ष करू नका. नाहीतर तुमच्या आधारकार्डचा अगदी सहज गैरवापर केला जाऊ शकतो. त्यामुळे आजच सावध व्हा.