तुम्हाला माहिती आहे का? भारतात किती लोक संस्कृत बोलतात...

भारतातील पाच राज्य आहेत. जिथे सर्वात जास्त लोक संस्कृत बोलतात. 

Updated: Jun 22, 2022, 08:28 PM IST
तुम्हाला माहिती आहे का? भारतात किती लोक संस्कृत बोलतात... title=

पोपट पिटेकर, मुंबई : संस्कृत भाषा ही जगातील सर्वात प्राचीन भाषांपैकी एक मानली जाते. संस्कृत भाषा ही प्राचीन, समृध्द,अभिजात आणि शास्रीय भाषा मानली जाते. संस्कृत भाषा ही हिंदू, बौध्द,आणि जैन धर्मांच्या उपासनेची भाषा आहे. प्राचीन काळापासून संस्कृत भाषा बोली जाते. आपल्या संस्कृतीतील महत्त्वाचे ग्रंथ रामायण आणि महाभारत हे वैश्विक संस्कृतमध्येच रचले गेले आहेत. यामुळे संस्कृत भाषाला अनन्य साधारण महत्त्व आहे.

संस्कृत किती लोक बोलतात ?

आपण पाहिलं तर भारतात संस्कृत बोलणा-या लोकांची संख्या खुप कमी आहे. भारतात प्रमुख्यांनी इतर भाषा पेक्षा खुप कमी लोक संस्कृत बोलतात. आणि लिहिणा-याची संख्या देखील खुप कमी आहे. हे 'द वायर'च्या एका रिपोर्टच्या जनगणनाच्या आधारित डेटामध्ये ही माहिती जाहीर झाली आहे. आपण 2011 ची जनगणना पाहिलं तर भारतात तब्बल 130 करोड लोकांच्या संख्येत फक्त 24 हजार 821 लोकचं संस्कृत बोलतात. याअधी 2001 मध्ये 14 हजार 135 लोक, इ.स 1991 मध्ये 49 हजार 736 लोक, इ.स 1981 मध्ये 6 हजार 106 लोक, आणि इ.स 1971 मध्ये 2 हजार 212 लोक संस्कृत बोलत होते.

आपण इ.स 1900 व्या दशकाचा संस्कृत बोलणा-यांचा इतिहास पाहिलं तर खुप चिंताजनक आहे. आपण पाहूयात कोणत्या साली किती लोक संस्कृत बोलत होते ते...  इ.स 1891 मध्ये 308 लोक, इ.स 1901 मध्ये 716 लोक,  इ.स.1911 मध्ये 360 लोक, इ.स.1921 मध्ये 356 लोक हे  संस्कृत बोलत होते. मागील 100 वर्षाचं विचार केलं तर खुप कमी संख्खेत लोक हे संस्कृत बोलत होते. या आधी देखील इ.स. 1800 च्या दशकात देखील संस्कृत बोलणा-यांची संख्या एक हजारच्या जवळपासच होतं.

सर्वात जास्त संस्कृत कुठे बोललं जातं ?

आपण राज्याचा विचार केलं तर भारतात 2011 च्या रिपोर्ट नुसार महाराष्ट्रात संस्कृत बोलणा-याची संख्या 3 हजार 802 लोक, बिहारमध्ये 3 हजार 388 लोक, उत्तरप्रदेश मध्ये 3 हजार 62 लोक, राजस्थानात 2 हजार 375 लोक, आणि मध्य प्रदेशमध्ये 1 हजार 871 लोक हे संस्कृत बोलतात. हे भारतातील पाच राज्य आहेत. जिथे सर्वात जास्त लोक संस्कृत बोलतात. नॉर्थ ईस्ट मध्ये काही राज्य असे आहेत. जिथे एकही व्यक्तीला संस्कृत बोलता येत नाही.

संस्कृत बोलणा-यांची संख्या वाढली का?

 उत्तर प्रदेश राज्य सोडलं तर अनेक राज्यामध्ये संस्कृत बोलणा-याची संख्येत वाढ देखील झाली आहे. आपण पाहिलं तर महाराष्ट्रात 2001 सालापर्यंत 408 लोक संस्कृत बोलत होते. आणि 2011 साली हाच आकडा 3 हजार 802 लोकांपर्यंत पोहचलं आहे. बिहारमध्ये दहा वर्षात 349 लोक संस्कृत बोलत होते. राजस्थानमध्ये 140 लोक, मध्यप्रदेश मध्ये 132 लोक,आणि कर्नाटकमध्ये 47 लोक हे संस्कृत बोलणा-यामध्ये वाढ झाली आहे. 

संस्कृत बोलण्यात कोणता जिल्हा अग्रेसर

संस्कृत बोलण्यात महाराष्ट्रातील पुणे, बिहार मधील किसनगंज, उत्तर प्रदेश मधील कानपूर, राजस्थान मधील झालावाड, कर्नाटक मधील बेंगलुरु, उत्तर प्रदेश मधील सीतापूर, आणि मध्यप्रदेश मधील होशंगाबादमध्ये संस्कृत हे जास्त लोक संस्कृत बोलतात.