तुम्हीपण जुनी गाडी वापरताय ? द्यावा लागणार जास्त टॅक्स

 जुन्या खासगी वाहनांवर लवकरच जादा कर भरावा लागणाराय

Updated: Jan 26, 2021, 03:34 PM IST
तुम्हीपण जुनी गाडी वापरताय ?  द्यावा लागणार जास्त टॅक्स title=

ब्युरो रिपोर्ट, झी २४ तास : 8 वर्षांपेक्षा जुन्या मालवाहू वाहनांवर आणि 15 वर्षांपेक्षा जुन्या खासगी वाहनांवर लवकरच जादा कर भरावा लागणाराय. वाहनांमुळं होणाऱ्या वायू प्रदूषणाची भरपाई म्हणून लवकरच वाहनचालकांना ग्रीन टॅक्स भरावा लागणाराय. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी हा निर्णय घेतलाय. मात्र तो लागू करण्यापूर्वी विविध राज्य सरकारांशी सल्ला मसलत केली जाणाराय.

8 वर्षांपेक्षा जुन्या ट्रान्सपोर्ट वाहनांवर फिटनेस प्रमाणपत्राच्या नुतनीकरणादरम्यान 10 ते 25 टक्क्यांपर्यंत ग्रीन टॅक्स लावला जाऊ शकतो. तर 15 वर्षांपेक्षा जुन्या खासगी वाहनांवर देखील ग्रीन टॅक्स लावण्यात येणाराय. 

सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या बसगाड्यांवर तुलनेनं कमी कर लावण्यात येणाराय. तर जास्त प्रदूषण असणाऱ्या शहरांमधल्या वाहनांवर 50 टक्क्यांहून अधिक ग्रीन टॅक्स लावला जाऊ शकतो.

दरम्यान, हायब्रिड, इलेक्ट्रिक वाहनं तसंच सीएनजी, इथेनॉल आणि एलपीजीवर चालणाऱ्या वाहनांकडून हा ग्रीन टॅक्स आकारला जाणार नाही. शेतीच्या कामासाठी वापरल्या जाणाऱ्या ट्रॅक्टर, हार्वेस्टर अशा वाहनांतून देखील यातून वगळण्यात येणाराय.

जुनी वाहनं जास्त प्रदूषण करत असल्यानं हा कर आकारला जाणारय. देशातील विविध राज्यांमध्ये याआधीच अशाप्रकारे ग्रीन टॅक्स वसूल केला जातोय. आता केंद्र सरकारनं हा निर्णय घेतल्यानं त्याची देशभरात अमलबजावणी होणाराय.