Lok Sabha Attack: आम्हाला मारू नका, आम्ही केवळ...; लोकसभेत पकडल्यानंतर आंदोलक काय म्हणाले? UAPA अंतर्गत गुन्हा दाखल

Lok Sabha Security Lapse UAPA Case: हनुमान बेनिवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन मुलांनी व्हिजीटर गॅलरीतून चेंबरमध्ये उडी मारली होती. यावेळी एक महिला त्यांना प्रोत्साहन देत होती आणि चौथा व्यक्ती कदाचित मार्शलची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत होता.

सुरभि जगदीश | Updated: Dec 14, 2023, 07:48 AM IST
Lok Sabha Attack: आम्हाला मारू नका, आम्ही केवळ...; लोकसभेत पकडल्यानंतर आंदोलक काय म्हणाले? UAPA अंतर्गत गुन्हा दाखल title=

Lok Sabha Security Lapse UAPA Case: बुधवारी संसदेची सुरक्षा भेदत दोन व्यक्तींनी लोकसभेत प्रवेश केला आणि देशात एकच खळबळ उडाली. संसदेमध्ये घुसखोरी करणा-या तरुणांवर UAPA अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 5 राज्यांमध्ये या प्रकरणी चौकशी सुरु करण्यात आलीये. संसद भवनाची  सुरक्षा  भेदल्याप्रकरणी चौकशी करण्यासाठी विशेष समिती स्थापन करण्यात आली असून दिल्ली पोलिसांच्या स्पेशल टीमकडे याच्या तपासाची जबाबदारी देण्यात आलीये. 

मिळालेल्या माहितीनुसार, याप्रकरणी एकूण 5 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. बुधवारी झालेल्या या प्रकरणात जेव्हा पहिला आंदोलक लोकसभेच्या बाकांवरून उडी मारून पळू लागला तेव्हा त्याला पकडणाऱ्या खासदारांमध्ये राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षाचे हनुमान बेनिवाल यांचाही समावेश 

हनुमान बेनिवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन मुलांनी व्हिजीटर गॅलरीतून चेंबरमध्ये उडी मारली होती. यावेळी एक महिला त्यांना प्रोत्साहन देत होती आणि चौथा व्यक्ती कदाचित मार्शलची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत होता.

या प्रकरणात बेनिवाल यांनीच बाकांवरून उड्या मारणाऱ्या सागर शर्माला पकडलं. यानंतर सागरला सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या ताब्यात देण्यापूर्वी त्याला मारहाण देखील करण्यात केली. या घटनेनंतर बेनिवाल यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं की, दोन तरुणांनी लोकसभेच्या चेंबरमध्ये ज्यावेळी उडी घेतली त्यावेळी सुमारे 150 खासदार सभागृहात होते.

खासदार बेनिवाल यांनी पुढे सांगितलं की, आम्ही त्या मुलांना पकडलं आणि त्यांना कानशिलात लगावली. मात्र यावेळी ते, आम्हाला मारू नका... आम्ही फक्त प्रोटेस्ट करण्यासाठी आलो आहोत, अशी विनवणी करू लागले. यावेळी खासदारांनी तुम्ही कशासाठी आंदोलन करत आहात, असं विचारलं असता त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर दिले नाही.

2001 च्या संसदेवर झालेल्या हल्ल्याच्या दिवशीच ही घटना घडल्यामुळे अनेक खासदारांनी अशा निषेधांवर गंभीर प्रश्न उपस्थित केलंय. बेनिवाल म्हणाले की, या मुलांनी सोडलेल्या धुरामुळे अनेक खासदारांची तब्येत बिघडल्याचं दिसून आलं. त्यावेळी आम्हाला असं जावणलं की, त्यांना सभापतींच्या खुर्चीकडे जायचं आहे. मात्र त्याचपूर्वी खासदारांनी त्यांना पकडलं.

UAPA अंतर्गत गुन्हा दाखल

UAPA कायदा हा अतिशय कडक कायदा आहे. हा कायदा दहशतवादी कारवायांना आळा घालण्यासाठी आणला गेलाय. या अंतर्गत दहशतवादी आणि नक्षलवाद्यांवर कडक कारवाई केली जाते. या कायद्यानुसार ३० दिवसांची पोलीस कोठडी मिळू शकते. तर न्यायालयीन कोठडी 90 दिवसांची असू शकते.

व्हिजिटर पास बंद

संसदेची सुरक्षा भेदली गेल्यानंतर आता सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलाय. संसदेसाठी मिळणारे व्हिजिटर पास आता बंद करण्यात आले आहेत. आरोपींची चौकशी पूर्ण होईपर्यंत कोणताही व्हिजिटर पास दिला जाणार नाही. खासदाराच्या व्हिजिटर पासवर आलेल्या दोघांनी प्रेक्षक गॅलरीतून थेट सभागृहात घुसखोरी केली होती. लोकसभेच्या सभागृहात पिवळा धूर सोडला. त्यामुळेच आता कोणतेही व्हिजिटर पास दिले जाणार नाहीत. त्याचप्रमाणे खासदारांच्या पीएंवर आणि माजी खासदारांनाही आरोपींची चौकशी पूर्ण होईपर्यंत प्रवेश बंद असणार आहे.