जाती-धर्मावरून भेदभाव करु नका, सरसंघचालकांचं स्वयंसेवकांना आवाहन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी जाती-धर्मावरून कुणाचाही भेदभाव करू नये. 

Updated: Jan 11, 2018, 11:38 PM IST
जाती-धर्मावरून भेदभाव करु नका, सरसंघचालकांचं स्वयंसेवकांना आवाहन  title=

भोपाळ : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी जाती-धर्मावरून कुणाचाही भेदभाव करू नये. सगळ्यांना सन्मानानं वागवावं, असं आवाहन सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलंय. मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये संघ कार्यकर्त्यांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

महाराष्ट्रातील कोरेगाव भीमा जातीय दंगलीच्या पार्श्वभूमीवर त्यांचं हे वक्तव्य महत्त्वाचं मानलं जातंय. भाजीवाले, कपडे धुणारे, केस कापणारे, चपला बनवणारे यांच्या घरोघरी जाऊन संक्रांतीच्या शुभेच्छा द्या. रक्षाबंधनाला आपण स्वतःच्या त्यांच्या घरी जाऊन राखी बांधणार आहोत. तसंच दिवाळीही त्यांच्या घरी साजरी करणार आहोत, असं भागवतांनी स्पष्ट केलं.