या राज्यात भूकंपाचा जोरदार धक्का, घाबरुन लोक अचानक घराबाहेर

Earthquake In Mizoram: मिझोराममधील लोकांना पहाटे भूकंपाचा धक्का बसला. लोक अचानक घराबाहेर पडू लागले. 

Updated: Nov 26, 2021, 08:14 AM IST
या राज्यात भूकंपाचा जोरदार धक्का, घाबरुन लोक अचानक घराबाहेर   title=

आयझॉल : Earthquake In Mizoram: मिझोराममधील लोकांना पहाटे भूकंपाचा धक्का बसला. लोक अचानक घराबाहेर पडू लागले. घरातील सिलिंग फॅनसह अनेक वस्तू हादरत होत्या. लोकांना संयम राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

भारताचे (India) ईशान्य राज्य मिझोराम आज (शुक्रवार) पहाटे भूकंपाच्या जोरदार धक्क्यांनी हादरले. (Earthqauke In Mizoram) भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर (Earthquake Intensity) 6.1 इतकी होती. मिझोरामशिवाय बांग्लादेशातही (Bangladesh) भूकंपाचे धक्के जाणवले. बांग्लादेशातील भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.3 इतकी मोजण्यात आली. भूकंपाचे धक्के जाणवताच लोक घाबरले आणि घराबाहेर पडले.

भूकंपानंतर प्रशासन सतर्क

भूकंप से कांपा मिजोरम, रिक्टर स्केल पर 6.1 रही तीव्रता; बांग्लादेश में था केंद्र

भूकंपानंतर प्रशासन सतर्क झाले असून मदतकार्य सुरू केले आहे. भूकंपानंतर येथे घबराहट निर्माण झाली आहे. लोकांना संयम बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र, अद्याप कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. भूकंपाचा धक्का भारत, बांगलादेश, म्यानमार आणि चीनपर्यंत पोहोचला.

भूकंपाचे केंद्र कोठे होते?

युरोपियन-मेडिटेरेनियन सिस्मॉलॉजिकल सेंटरनुसार, (European-Mediterranean Seismological Centre) भूकंपाचा केंद्रबिंदू बांग्लादेशातील चितगावच्या  (Chittagong) पूर्वेला 175 किमीपर्यंत होता.

 
भूकंप का होतो?

पृथ्वीच्या आत 7 प्लेट्स आहेत, ज्या सतत फिरत असतात. जिथे या प्लेट्स जास्त आदळतात, त्या झोनला फॉल्ट लाइन म्हणतात. वारंवार टक्कर झाल्यामुळे, प्लेट्सचे कोपरे वळवले जातात. जेव्हा जास्त दाब तयार होतो, तेव्हा प्लेट्स तुटतात आणि खालील ऊर्जा बाहेर पडण्याचा मार्ग शोधते. मग या धक्यानंतर भूकंप येतो.