परदेशी पर्यटकांना पर्यटन मंत्र्यांनी दिला 'हा' सल्ला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात नव्याने केंद्रीय पर्यटन मंत्री झालेल्या के. जे. अल्फोंस यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Sep 8, 2017, 04:56 PM IST
परदेशी पर्यटकांना पर्यटन मंत्र्यांनी दिला 'हा' सल्ला title=
File Photo

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात नव्याने केंद्रीय पर्यटन मंत्री झालेल्या के. जे. अल्फोन्स यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

बीफ म्हणजेच गोमांस या विषयावरून देशात सध्या अनेक वाद होत आहेत. कथित गोरक्षकांकडून अनेकांना मारहाणही करण्यात आली आहे. आता याच बीफच्या मुद्द्यावरुन केंद्रीय पर्यटन मंत्री के.जे. अल्फोन्स यांनी परदेशी पर्यटकांना एक सल्ला दिला आहे.

परदेशातून भारतात येणा-या पर्यटकांनी भारतात येण्यापूर्वी आपल्या देशात बीफ (गोमांस) खाऊन यावे असे वक्तव्य अल्फोन्स यांनी केलं आहे. गुरुवारी भुवनेश्वर येथे इंडियन असोसिएशन ऑफ टूर ऑपरेटर्स संमेलनासाठी अल्फोन्स उपस्थित होते, त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे

अल्फोन्स यांनी म्हटले की, "परदेशी पर्यटक त्यांच्या देशात गोमांस खाऊ शकतात. त्यामुळे त्यांनी तेथे बीफ खावं आणि मग भारतात यावं."

रविवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात के. जे.  अल्फोन्स यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर म्हणजेच ४ सप्टेंबर रोजी के. जे. अल्फोन्स यांनी वक्तव्य केलं होतं की, केरळचे लोक बीफ खाऊ शकतात.