राष्ट्रपतींची बहीण ते मंत्र्याच्या पत्नींपर्यंत, अय्याश अधिकाऱ्याने कोणालाच नाही सोडलं! 400 व्हिडीओ क्लिप व्हायरल

ebang engonga adult video Controversy: एबांग एंगोगा नावाच्या उच्च पदस्थ अधिकाऱ्याचे कारनामे ऐकून धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. 

Updated: Nov 9, 2024, 08:15 PM IST
राष्ट्रपतींची बहीण ते मंत्र्याच्या पत्नींपर्यंत, अय्याश अधिकाऱ्याने कोणालाच नाही सोडलं! 400 व्हिडीओ क्लिप व्हायरल title=
एबांग एंगोगा

ebang engonga adult video Controversy: जेडीएस नेता प्रज्वल रेवण्णाचे कथित व्हिडीओ समोर आल्यानंतर देशभरात खळबळ उडाली होती. पक्षातील महिला कार्यकर्त्या ते घरातील नोकरदार महिलांपर्यंत सर्वांचे लैगिक शोषण केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला होता. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ज्यामध्ये एका इसमाच्या एक-दोन नव्हे तर तब्बल 400 व्हिडीओ क्लिप्स समोर आल्या आहेत. 

भारतातून नव्हे तर मध्य आफ्रिकन देश इक्वेटोरियल गिनी येथून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. जिथे एबांग एंगोगा नावाच्या उच्च पदस्थ अधिकाऱ्याचे कारनामे ऐकून धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. एबांगच्या साधारण 400 अॅडल्ट व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे एबांग याने ज्या महिलांसोबत शारीरिक संबंध ठेवले आहेत त्यापैकी अनेक महिला या बड्या अधिकाऱ्यांच्या पत्नी आहेत. एवढेच नव्हे तर या अय्याश व्यक्तीने राष्ट्रपतींच्या चुलत बहीणीलाही सोडले नाही. तसेच पोलीस महासंचालकांची पत्नी आणि 20 हून अधिक मंत्र्यांच्या पत्नींशी त्याने संबंध ठेवले. सोबतच व्हिडीओ क्लिप्सही बनवल्या. 

एबांग एंगोगा हा इसम इक्वेटोरियल गिनीमधील नॅशनल फायनान्शियल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (ANIF) चा संचालक आहे. त्याच्याशी संबंधित प्रकरण उघडकीस येताच तिथल्या सरकारला मोठा धक्का बसला. यावर, देशाचे उपराष्ट्रपती टिओडोरो न्ग्युमा ओबियांग मंग्यू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ज्यांच्या पत्नीशी एबांग एंगोगा यांचे संबंध आहेत, अशा सर्व अधिकाऱ्यांना निलंबित करणार असल्याचे ते म्हणाले. अशा घृणास्पद कृत्यामुळे देशाची आचारसंहिता आणि नैतिक कायद्याचे थेट उल्लंघन होत असल्याचे सांगत त्यांनी चिंता आणि राग व्यक्त केला.

एबांग एंगोगाशी संबंधित व्हिडिओ कुठे व्हायरल झाला?

एबांग एंगोगाशी संबंधित व्हिडिओ सर्वात आधी व्हॉट्सॲप ग्रुपवर व्हायरल झाला. यानंतर फेसबुक, इंस्टाग्राम आणि टिक-टॉकसारख्या वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हळूहळू ते व्हिडीओ वेगाने पसरु लागले. हे व्हिडीओ कोणी व्हायरल केले, का केले? याबद्दलची माहिती समोर आली नाहीय. तपास यंत्रणा याचा शोध घेत आहेत. असे असले तरी यामुळे सरकारची मोठी गोची झाली. 

यानंतर स्थानिक सरकारने दूरसंचार मंत्रालय, नियामक आणि टेलिफोन कंपन्यांना महत्वाचे निर्देश जारी केले आहेत. एबांग एंगोगाशी संबंधित आक्षेपार्ह व्हिडिओ सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून 24 तासांच्या आत हटवण्याचे आदेश सरकारकडून देण्यात आले.

एबांग एंगोगवर काय कारवाई होणार?

एबांग एंगोगा हा इक्वेटोरियल गिनीमधील नॅशनल फायनान्शियल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (ANIF) चा संचालक आहे. तो दिसायला देखणा आहे. यामुळे लोक त्याला बेलो म्हणून ओळखतात. एबांग हा विवाहित आहे. त्याचे 400 हून अधिक महिलांशी संबंध असल्याचे व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाले. त्याचे वडील बाल्टसार एंगोगा अडजो हे स्वतः सेंट्रल आफ्रिकन इकॉनॉमिक अँड मॉनेटरी कम्युनिटी कमिशनचे अध्यक्ष आहेत.एबांग एंगोगावर सरकार काय कारवाई करणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.