What is ITEP course: सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सरकारी शाळांमध्ये शिक्षक होण्यासाठी बीएड कोर्सला आता अभ्यासक्रमाचा दर्जा राहणार नाही. या कोर्सच्या जागी आता ITEP प्रोग्रॅम असणार आहे. नॅशनल काऊंसिल फॉर टीचर एज्युकेशनने हा प्रोग्रॅम तयार केला आहे. या प्रोग्रॅमला ITEP असं नावं देण्यात आलं आहे. हा कोर्स चार वर्षांचा असणार आहे. 2030 नंतर ITEP कोर्सअंतर्गत शिक्षक भरती केली जाणार आहे.
वास्तविक BEd कोर्स यापुढेही सुरु राहाणार आहे. पण तो केवळ शैक्षणिक भाग असेल. यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन आणि PHd करता येणार आहे. पुढच्या काही वर्षात जवळपास सर्व BEd महाविद्यालयात ITEP कोर्सचा पर्याय सुरु होईल. भविष्यात उच्च शिक्षणापासून प्राथमिक शिक्षणापर्यंत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू केलं जाणार आहे. याअंर्गत शैक्षणिक क्षेत्रात नवे बदल होणार आहेत. यानुसार 2030 पासून चार वर्षांचा बीएड किंवा चार वर्षांचा एकात्मिक शिक्षक कार्यक्रम (ITEP) पदवी अनिवार्य करण्याची तयारी सुरू आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार बालवाडी ते इयत्ता 12 व पर्यंत शिक्षकांची किमान पात्रता निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये BA-BEd, BSc-BEd आणि BCom-BEd यांचा समावेश आहे. सध्या 2023-24 या शैक्षणिक सत्रापासून 41 विद्यापीठांमध्ये प्रायोगिक तत्तावर चार वर्षांचा बीएड कार्यक्रम सुरू करण्यात येत आहे.
नॅशनल टेस्टिंग एजन्सी पुढील आठवड्यात या राष्ट्रीय सामाईक प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज विंडो उघडेल. राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद (NCETE) NEP 2020 च्या शिफारशींनुसार चार वर्षांचा B.Ed कार्यक्रम सुरू केला जाणार आहे. एंट्रेन्स परीक्षेसाठी उमेदवारांना गुणवत्तेच्या आधारावर अभ्यासक्रमात प्रवेश दिला जाईल. सत्र 2024-25 पासून आयटीईपी या 4 वर्षांच्या एकात्मिक शिक्षण कार्यक्रमाच्या पायलट प्रोजेक्टसाठी विद्यापीठांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. आता हा नवीन बी.एड कार्यक्रम नवीन शिक्षण मॉडेलनुसार मुलांना शिकवण्यासाठी तयार केला जाणार आहे.
विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) विद्यापीठांमध्ये प्राध्यापक पदांसाठी भरती प्रक्रिया सुलभ करण्यासाठी एक मोठे पाऊल उचललं आहे. UGC ने सेंट्रल युनिव्हर्सिटी (CU) फॅकल्टी रिक्रूटमेंट पोर्टल CU-ही निवड सुरू केली आहे. या पोर्टलच्या मदतीने विद्यापीठांमध्ये प्राध्यापक, सहायक प्राध्यापकांसह प्राध्यापक पदांसाठी अर्ज करणे सोपे होणार आहे.