नोटाबंदीचा भारताच्या शिखर बँकेलाच फटका

नोटाबंदीच्या निर्णयाचा रिझर्व्ह बँकेला जोरदार फटका बसल्याचं पुढे येतंय.

Updated: Aug 11, 2017, 10:07 PM IST
नोटाबंदीचा भारताच्या शिखर बँकेलाच फटका title=

मुंबई : नोटाबंदीच्या निर्णयाचा रिझर्व्ह बँकेला जोरदार फटका बसल्याचं पुढे येतंय.

रिझर्व्ह बँकेनं सालाबादप्रमाणे यंदाही सरकारला लाभांश दिला. पण गेल्या वर्षीच्या तुलनेत थेट निम्म्यावर आलाय. गुरुवारी रिझर्व्ह बँकेनं सरकारच्या तिजोरीत तीस हजार कोटी रुपये लाभांश अर्थात नफ्याचा वाटा जमा केला. ही रक्कम गेल्या वर्षीच्या तुलनेत निम्मी आहे.

गेल्या वर्षीच रिझर्व्ह बँकच्या नफ्यात नोटाबंदीच्या निर्णयामुळे मोठी घट नोंदवण्यात आलीय. नोटाबंदीनंतर बँकांकडे मोठ्या प्रमाणात पैसे जमा झाले. अतिरिक्त पैसे सर्व बँकांनी रिझर्व्ह बँकेकडे जमा केले. या पैशांवर रिझर्व्ह बँक बँकांना व्याज देते. नोटाबंदीनंतर या व्याजापोटी दररोज रिझर्व्ह बँकेला दररोज दोन ते अडीच लाख कोटी रुपये मोजावे लागले. त्यामुळे एकूण नफ्यात 6 टक्के रक्कम कमी झाली. 

त्याचप्रमाणे डॉलरच्या तुलनेत रुपयाची वाढलेली किंमत, नव्या नोटा छपाईचा खर्च या दोन महत्वाच्या कारणांमुळेही रिझर्व्ह बँकेच्या नफ्यात घट झालीय.