गुवाहाटी : Maharashtra Political Crisis update : एकनाथ शिंदे प्रत्येक आमदाराची रुममध्ये जाऊन वैयक्तिक भेट घेत आहेत. गुवाहाटीतील हॉटेल रेडिसन ब्ल्यू मध्ये एकनाथ शिंदे त्यांना पाठिंबा देणाऱ्या आमदारांच्या खोलीतमध्ये जाऊन त्यांच्या भेटी घेत आहे. त्यांच्यासोबत आलेल्या आमदारांचे मनोधैर्य उंचवण्यासाठी आणि, उत्साह कायम ठेवण्यासाठी त्याचबरोबर पुढील रणनीतीच्या दृष्टीने रात्री शिंदे प्रत्येक आमदाराच्या खोलीमध्ये जाऊन भेटत होते.
एकनाथ शिंदे यांचा आमदारांच्या वैयक्तिक गाठीभेटी घेत असल्याची या हॉटेलची संपूर्ण दृष्य ही आपण प्रथमच 'झी24तास' हाती लागली आहेत. हॉटेल रेडिसन ब्लूमधील चार माळे एकनाथ शिंदे समर्थकांची निवास रुम व्यवस्था करण्यात आली आहे. हे आमदार महाराष्ट्रातील घडामोडींसाठी मराठी वृत्तवाहिनीवर सातत्याने नजर ठेवून आहेत.
दरम्यान, शिंदे गट आज अधिकृत भूमिका मांडणार आहे. मीडियापासून लांब राहणाऱ्या शिंदे गटाची आज पहिली पत्रकार परिषद होत आहे. आमदार बच्चू कडू आणि भरत गोगावले हे पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यामुळे शिंदे गटाची नेमकी पुढील काय भूमिका असणार आहे, याचा उलगडा होणार आहे. शिंदे गटाची आज 2 वाजता महत्त्वाची बैठक होत आहे. भरत गोगावले, बच्चू कडू भूमिका स्पष्ट करणार आहेत.
शिंदे गटाकडून आज शिष्टमंडळाची स्थापना होणार आहे. तसेच इतर राजकीय पक्षांशी वाटाघाटी करणार असल्याची माहिती मिळत आहे. शंभुराजे देसाई, गोगावले आणि भुसे आणि बच्चू कडू हे शिष्टमंडळात असणार आहेत. बडोद्याला शिष्ट मंडळाची चर्चा होणार आहे. तर एकनाथ शिंदे गट प्रवक्त्यांची नेमणूक करणार आहेत. प्रवक्ता गटाची भूमिका माध्यमांद्वारे लोकांपर्यंत पोहोचवणार आहेत. प्रवक्ते नेमणुकीचा निर्णय आजच्या बैठकीत होण्याची शक्यता आहे. जनतेपर्यंत गटाची भूमिका पोहोचवण्यासाठी प्रवक्ता नेमणूक होत असल्याचे सांगण्यात येत आहे.