'राजकीय पक्षांचा एककलमी कार्यक्रम - काहीही करून निवडणुका जिंकणं'

कुठल्याही परिस्थितीत निवडणूक जिंकणे एवढा एककलमी कार्यक्रम राजकीय पक्ष राबवत असल्यानं देशात मुक्त निवडणुका घेणे कठीण होत असल्याचं परखड मत निवडणूक आयुक्त ओमप्रकाश रावत यांनी व्यक्त केलंय. 

Updated: Aug 18, 2017, 03:54 PM IST
'राजकीय पक्षांचा एककलमी कार्यक्रम - काहीही करून निवडणुका जिंकणं' title=

नवी दिल्ली : कुठल्याही परिस्थितीत निवडणूक जिंकणे एवढा एककलमी कार्यक्रम राजकीय पक्ष राबवत असल्यानं देशात मुक्त निवडणुका घेणे कठीण होत असल्याचं परखड मत निवडणूक आयुक्त ओमप्रकाश रावत यांनी व्यक्त केलंय. 

नुकत्याच झालेल्या गुजरातच्या राज्यसभा निवडणुकीत अहमद पटेल यांच्या निसटत्या विजयानंतर आलेलं हे विधान राजकीय पक्षांना चांगलचं झोंबणारं आहे. निवडणूक जिंकण्यासाठी राजकीय पक्ष नैतिकतेची सारी बंधनं झुगारत असल्याचं रावत यांनी म्हटलंय. राजकीय पक्षामध्ये सत्तेत येण्यासाठीची लागलेली स्पर्धा जीवघेणी असल्याचंही रावत यांनी म्हटलंय.

लोकशाही तेव्हाच मजबूत बनेल जेव्हा निवडणुकी पारदर्शी, निष्पक्ष आणि मुक्त असतील... परंतु, असं दिसतं की स्वार्थी व्यक्तीसाठी सर्वात महत्त्वाचं असतं ते जिंकणं... आणि यासाठी ते नैतिकतेला बाजुला सारतात. आमदारांना विकत घेणं, त्यांना धमकावणं याला 'निवडणूक मॅनेंजमेंट' संबोधलं जातं.

निवडणूक जिंकणाऱ्यानं कोणतेच पापं केलेली नसतात कारण निवडणुकीत जिंकल्यानंतर त्याची सगळी पापं आपोआपच धुतली जातात. राजकारणात आता हे 'सामान्य' आहे, असंही त्यांनी म्हटलंय. 'असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स'नं आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.