नागरिकांनी फकिराची झोळी भरली; विजयानंतर नरेंद्र मोदींनी मानले जनतेचे आभार

पंडित जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्यानंतर पूर्ण बहुमतासोबत सलग दुसऱ्यांदा सत्तेच्या शिखरावर पोहचण्याचा बहुमान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मिळवलाय

Updated: May 23, 2019, 08:37 PM IST
नागरिकांनी फकिराची झोळी भरली; विजयानंतर नरेंद्र मोदींनी मानले जनतेचे आभार   title=

नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक २०१९ च्या निकालासहीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक नवा इतिहास रचलाय. पंडित जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्यानंतर पूर्ण बहुमतासोबत सलग दुसऱ्यांदा सत्तेच्या शिखरावर पोहचण्याचा बहुमान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मिळवलाय. तर नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदाच काँग्रेसशिवाय हा बहुमान भारतीय जनता पक्षाला मिळालाय. आज जाहीर झालेल्या निवडणुकीत भाजपानं बहुमताचा आकडा अगदी सहजच गाठलेला दिसतोय. २०१४ च्या निवडणुकीतही भाजपनं लोकसभेच्या ५४३ मतदार संघांपैकी २८२ मतदान संघांत विजय प्राप्त केला होता. खुद्द नरेंद्र मोदींनी वाराणसी मतदार संघातून नरेंद्र मोदी तब्बल ४ लाख ७९ हजार ५०५ मतांनी विजय प्राप्त केलाय.

भाजप सभास्थळी दाखल झालेल्या पंतप्रधानांचं कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केलं. यावेळी नरेंद्र मोदी एखाद्या हिरोपेक्षा वरचढ वाटत होते. भाजप अध्यक्ष अमित शाह हेदेखील यावेळी नरेंद्र मोदींसोबत कार्यकर्त्यांना सामोरे गेले.

नरेंद्र मोदी LIVE 

 

* सर्व कार्यकर्त्यांचं अभिनंदन आणि आभार - नरेंद्र मोदी

* माझा प्रत्येक क्षण, माझा प्रत्येक कण कण देशाला समर्पित - नरेंद्र मोदी

* तुम्ही पुन्हा एकदा जबाबदारी सोपवलीय, येणाऱ्या दिवसांत दुर्विचारानं कोणतंही काम करणार नाही... याला तुम्ही माझं वचन समजा किंवा माझी प्रतिबद्धता - नरेंद्र मोदी

* २०२४ पूर्वी देशाला एका नव्या उंचीवर न्यायचंय - नरेंद्र मोदी

* हा मोदींचा विजय नाही तर प्रामाणिकपणासाठी तडफडणाऱ्या जनतेचा - नरेंद्र मोदी

* पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत कार्यकर्त्यांच्या 'भारत माता की जय'च्या घोषणा

* भारतीय जनता पार्टी भारताच्या संविधानाप्रती समर्पित - नरेंद्र मोदी 

* विजयी उमेदवार कोणत्याही पक्षाचे, कोणत्याही पार्श्वभूमीचे असले तरीही त्यांना मी शुभेच्छा देता - नरेंद्र मोदी

* हा विजय आम्ही नम्रतापूर्वक जनता-जनार्दनाच्या चरणी अर्पण करतो - नरेंद्र मोदी

* माझ्या मनातील भावना आज भारतीय जनतेनं प्रकट केल्या... त्यामुळे आजचा विजय जनतेचाच... 

* ही निवडणूक कोण्या पक्षानं किंवा नेत्यानं नाही तर देशातील जनतेनं लढवली - नरेंद्र मोदी

* स्टेजसमोरून कार्यकर्त्यांतून मोदी-मोदीच्या घोषणा

* यंदाच्या निवडणुकीत सर्वाधिक मतदान | हा लोकशाहीचा सर्वात मोठा विजय

* भारताच्या उज्ज्वल भविष्याची खात्री - नरेंद्र मोदी

* देशाच्या नागरिकांनी फकिराची झोळी भरली 

* देशातील १३० करोड नागरिकांना वाकून नमन करतो, नरेंद्र मोदींनी जनतेचे मानले आभार