VIDEO : पर्यटकांवर हत्तीचा भयाण हल्ला, व्हिडीओ पाहून बसेल धडकी

पर्यटकांच्या जीपवर हत्तीचा भयानक हल्ला 

Updated: Dec 1, 2021, 08:16 AM IST
VIDEO : पर्यटकांवर हत्तीचा भयाण हल्ला, व्हिडीओ पाहून बसेल धडकी  title=

मुंबई : जंगलात राहणारे प्राणी नेहमी माणसांपासून दूर राहू इच्छितात. त्यांनाही त्यांच्या घरात माणसांप्रमाणे आरामात राहायला आवडते. जिथे त्यांच्या आयुष्यात कोणीही ढवळाढवळ करत नाही. पण पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आपण अनेकदा जंगल सफारीची निवड करतो. आणि ही निवड कधी कधी आपल्याला खूपच भारी पडते. 

कधी-कधी तो हल्ला माणसांसाठी जीवघेणा ठरतो. वन्य प्राण्यांचे बळी ठरतात (Elephant Viral Video). तुम्ही असे अनेक व्हिडिओ पाहिले असतील ज्यात वन्य प्राण्यांनी माणसांवर हल्ला केला असेल.

आज असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळाला. येथे जंगलात फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांची जीप पाहून हत्ती संतापले. यानंतर त्याने जीपवर हल्ला केला. हा व्हायरल व्हिडिओ IFS अधिकारी परवीन कासवान यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की जंगलात पर्यटक जीपमध्ये स्वार होऊन मजा करायला आले आहेत.

पर्यटकांवर हल्ला करतो हत्ती 

आपण पाहू शकता की काही हत्ती जंगलात फिरत आहेत. हत्ती पाहण्यासाठीच पर्यटक जंगलात आल्याचे दिसते. यानंतर पर्यटकांची नजर हत्तींच्या कळपावर पडताच त्यांनी त्यांचे फोटो क्लिक करायला सुरुवात केली. नेमके हेच हत्तींना आवडत नाही. त्यानंतर ते वेगाने पर्यटकांकडे येऊ लागतात.

व्हिडिओमध्ये तुम्ही हत्तीचा राग पाहू शकता. एक हत्ती इतका संतप्त झालेला दिसतो की तो पर्यटकांच्या गाडीची तोडफोड करतो. हत्ती आपल्या सोंडेने गाडीवर जोरात ढकलायला लागतो. संतप्त हत्तीच्या अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे पर्यटक घाबरून मोठ्याने ओरडू लागले.

असा वाचवला पर्यटकांनी आपला जीव

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की हत्तीपासून वाचण्यासाठी एक माणूस त्या सर्व पर्यटकांना जीपमधून पळवून लावतो. त्यामुळे पर्यटकांचे प्राण वाचले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे. व्हिडिओ शेअर करताना IFS अधिकाऱ्याने लिहिले की, 'जेव्हा तुम्ही त्यांच्या घरी जाऊन त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करता.' ३१ सेकंदाचा व्हिडिओ आतापर्यंत ४१ हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे.