श्रीनगर : पुलवामा सेक्टरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत भरतीय जवानांना मोठं यश मिळालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा पोलिसांनी खात्मा केला आहे. तर अद्यापही याठिकाणी शोध मोहिम सुरू आहे. काही दहशतवादी पुलवामा सेक्टरमध्ये लपून बसल्याची माहिती भारतीय सुरक्षा दलाला मिळाली होती. गुप्तचर माहितीच्या आधारे स्थानिक पोलिसांसह सुरक्षा दलाने परिसरात शोधमोहिम सुरू केली.
जेव्हा दहशतवाद्यांच्या लक्षात आलं की आपल्याला पूर्णपणे घेरलं आहे, तेव्हा दहशतवाद्यांनी गोळीबार करण्यास सुरूवात केली. यानंतर काही दहशतवादी लपून बसले. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, तीन दशहतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. काही दहशतवादी अद्यापही लपून बसल्याची माहिती मिळत आहे.
Jammu & Kashmir: Security personnel deployed in Pulwama town where an encounter broke out earlier today. Operation underway.
(Visuals deferred by unspecified time) pic.twitter.com/V4agNs0OeT
— ANI (@ANI) July 14, 2021
दरम्यान, उत्तर प्रदेश पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाला (एटीएस) मोठे यश मिळाले आहे. रविवारी लखनौमध्ये अटक करण्यात आलेल्या या दोन दहशतवाद्यांना अटक केली. एटीएसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अल कायदाचा पाठिंबा असलेले हे दहशतवादी मोठ्या हल्ल्याची योजना आखत होते.
दहशतवाद्यांनी वेबसाईटवर बघून बॉम्ब तयार केल्याची माहिती हाती लागली आहे. अल कायदाच्या दोन्ही संशयितांनी चौकशीत सांगितले आहे की या सर्वांनी अवघ्या 3000 रुपयात प्रेशर कुकर बॉम्ब तयार केला होता.