मृत्यूनंतरचे रहस्य जाणून घेण्यासाठी उच्चशिक्षित इंजिनियरची आत्महत्या

प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिलतेच असे नसते.

Updated: Jan 3, 2018, 10:55 AM IST
मृत्यूनंतरचे रहस्य जाणून घेण्यासाठी उच्चशिक्षित इंजिनियरची आत्महत्या  title=

दिल्ली : प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिलतेच असे नसते.

अनेकदा अशाच भंडावून सोडणार्‍या प्रश्नांच्या मागे अनेकजण वेळ वाया घालवतो. अशाच प्रकारे मृत्यूनंतर नेमके काय होते ? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी एका उच्चशिक्षित अभियंत्याने आपला जीव गमावला आहे.  

दिल्लीतील घटना 

बुराडी येथील २५ वर्षीय इंजिनियर नवदीप याने मृत्यूचे रहस्य जाणून घेण्यासाठी इमारतीच्या दुसर्‍या मजलयावरून आत्महत्या केली आहे. 

नवदीपकडे 'लाईफ आफ्टर डेथ' नावाचे पुस्तक, लॅपटॉप आणि मोबाईल सापडला आहे. नवदीपच्या दोन पानी सुसाईड नोटमध्येही मृत्यूनंतरचे सत्य जाणून घेण्यासाठी  आत्महत्या करत असल्याचे लिहले आहे.  

नवदीप नैराश्यात  होता 

नवदीप निराशेमध्ये होता. तो अनेक दिवसांपासून आत्महत्या करण्याचे विविध मार्ग शोधत होता. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही त्याने अनेकदा मनात आत्महत्येचा विचार येत असल्याचे लिहले होते. मुलाची अवस्थ्या पाहून नवदीपची आईदेखील चिंतेमध्ये होती. जागेत बदल हवा म्हणून नवदीपसह त्याची आई बुराडीमध्ये रहायला आली होती.  नवदीपने सोमवारी रात्री आत्महत्या केली.  

उच्चशिक्षित परिवार  

नवदीपचे सारे कुटुंबीय इंजिनिअरिंग क्षेत्राशी निगडीत आहेत. नवदीपचे काही कुटुंबिय दुबईमध्ये राहतात. 
नवदीपने कोलकत्त्यामधून इंजिनिअरिंगचे शिक्षण घेऊन दीड वर्ष मर्चंट नेव्हीमध्ये नोकरी केली. नोकरी केल्यानंतर एमटेक करण्यासाठी तो स्वीडनमध्ये गेला होता.  मागील वर्षी म्हणजे २०१७ साली तो भारतामध्ये परतला होता. दिल्लीतील पटेल नगरमध्ये नवदीप राहत होता. तेथेच तो पीएचडीसाठी प्रयत्न करत होता. मात्र त्याचे प्रयत्न अयशस्वी ठरत होते.