दिवाळीआधी EPFO कर्मचाऱ्यांसाठी खुषखबर

EPFO कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनसची भेट

Updated: Oct 15, 2019, 07:25 PM IST
दिवाळीआधी EPFO कर्मचाऱ्यांसाठी खुषखबर title=
संग्रहित फोटो

नवी दिल्ली : सरकारने ईपीएफओ (EPFO) कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनसची भेट दिली आहे. कर्मचाऱ्यांना ६० दिवसांचा बोनस मिळणार आहे. कामगार मंत्रालयने हा आदेश जारी केला आहे. कामगार मंत्रालयाच्या आदेशानुसार, EPFO च्या ग्रुप B आणि ग्रुप C च्या कर्मचाऱ्यांना Productivity Linked Bonus (PLB) देण्यात येणार आहे.

सरकारने  ग्रुप B आणि ग्रुप Cच्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना ३०.४ दिवसांच्या बोनसची घोषणा केली होती. म्हणजे त्यांना जवळपास ७ हजार रुपये बोनस ठरवण्यात आला होता. EPFOच्या प्रत्येक कर्मचाऱ्यांना हा आकडा वेगळा असेल.

राज्य संयुक्त कर्मचारी परिषदेचे समन्वयक आरके वर्मा यांच्या मते, EPFO कर्मचाऱ्यांच्या बोनसचा फॉर्म्युला इतर सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे असेल असे त्यांना सांगितले.

यूपीमध्ये ८ लाख Non Gazetted Officersलादेखील बोनसची घोषणा करण्यात आली आहे. बोनसची रक्कम ७ हजार रुपये असणार आहे. तसेच महागाई भत्त्याचीही घोषणा या महिन्याच्या शेवटी होण्याची शक्यता आहे.

सरकारने बोनसचा २५ टक्के भागच वेतनात देणार असल्याचे सांगितले. तर इतर ७५ टक्के कर्मचाऱ्यांच्या PFमध्ये जमा होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.