मुंबई : चांगल्या पगाराची नोकरीची संधी मिळाल्याने खूप जण आधीची नोकरी सोडतात. नोकरी सोडताना संबंधित कर्मचाऱ्याला सर्व औपाचारिकता पूर्ण केल्यावर कंपनीतून बाहेर पडता येतं. मात्र अशा वेळेस एक बाब हमखासपणे राहून जाते, त्यामुळे नंतर त्या कर्मचाऱ्याला अडचणीचा सामना करावा लागतो. ही समस्या पीएफसंदर्भात (EPFO) असते. (epfo date of exit can be filled by yourself after changing company know step by step process)
नोकरी सोडताना अनेक जण पीएफ खात्यात डेट ऑफ एक्झिट (Date of Exit) टाकून घेत नाहीत. हे काम कंपनीचं असतं. हे काम न झाल्याने नंतर जुन्या कंपनीत खेटे मारावे लागतात किंवा मग संबंधित व्यक्तीला फोनाफोनी करुन विनवणी करावी लागते.
पण आता डेट ऑफ एक्झिटची तारीख ही स्वत: तो कर्मचारीही टाकू शकतो. तसेच आधीच्या पीएफ खात्यातील रक्कम नवीन खात्यात ऑनलाईन कशी वळती करुन घ्यायची हे आपण जाणून घेऊयात.
अशी सबमिट करा Date Of Exit
- https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ या वेबसाईटवर जा.
- यूएएन आणि पासवर्ड टाकून लॉगीन करा.
- Manage' या टॅबवर क्लिक करा. इथे तुम्हाला सर्वात शेवटी 'Mark Exit' हा पर्याय दिसेल. या पर्यायावर क्लिक करा.
- यानंतर नोकरी सोडलेला ठिकाणचा पीएफ नंबर निवडा, ज्यात तुम्हाला 'Date of Exit' टाकायची आहे. तारीख टाकल्यानंतर कारण निवडा. त्यानंतर 'Request OTP' वर क्लिक करा.
- आधारसोबत लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर तुम्हाला एक ओटीपी मिळेल. मिळालेला ओटीपी रकान्यात भरा आणि सबमिट केला. यानंतर तुमचा फॉर्म सबमिट होईल.
ही बाब लक्षात ठेवा
Date of Exit भरण्याची ही सुविधा खूप चांगली आहे. पण तुम्ही हे काम जुन्या कंपनीने 2 महिन्याची पीएफ रक्कम खात्यात जमा केल्यानंतर करु शकता. यानंतरच पीएफ काढता येईल किंवा नवीन पीएफ खात्यात ट्रान्सफर करता येईल. यासोबतच मोबाईल नंबर तुमच्या आधार क्रमांकाशी लिंक असेल, तरच तुम्हाला OTP मिळेल.