Lockdown in Kerala | कोरोनाचा वाढता कहर, अखेर केरळात आज लॉकडाऊन

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी राज्य सरकारने लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.  

Updated: Jan 23, 2022, 03:22 PM IST
Lockdown in Kerala | कोरोनाचा वाढता कहर, अखेर केरळात आज लॉकडाऊन title=

तिरुवनंतपुरम | केरळात कोरोनाचा संसर्ग (Corona) दिवसेंदिवस वाढतोय. त्यामुळे आरोग्य विभागाच्या चिंतेत वाढ झालीये. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी राज्य सरकारने लॉकडाऊन (Lockdown in Kerala)  लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. हा लॉकडाऊन एकदिवसीय आहे. म्हणजेच रविवारपुरताच मर्यादित आहे. सरकारने लॉकडाऊनमधून फक्त अत्यावश्यक सेवांनाच सूट दिली आहे. (today sunday 23 january 2022 lockdown in kerala due to incresing corona patients) 

कोरोनाचा स्थितीचा आढावा घेण्यासाठी गुरुवारी उच्च स्तरिय बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत 23 आणि 30 जानेवारीला फक्त अत्यावश्यक सेवांनाच परवानगी देण्यात येईल, असा निर्णय घेण्यात आला होता. तसेच एकदिवसीय लॉकडाऊनच्या दिवशी म्हणजेच रविवारी किराणा दुकानं आणि बाजारपेठांना  सकाळी 7 ते रात्री 9 पर्यंतच मुभा देण्यात आली.  

राज्य सरकारच्या निर्णयानुसार, लॉकडाऊनदरम्यान खासगी वाहनांवर बंदी असेल. तसेच ज्या प्रवाशांनी विमान तिकीट काढली आहेत, त्यांना चौकशी करुन जाण्याची परवानगी असणार आहे.  तसेच हॉटेल आणि मेडिकलमध्ये टेक अवे सेवा सुरु असेल. 

केरळात कोरोनाचा कहर

केरळात शनिवारी 45 हजार 136 कोरोनाबाधितांची नोंज करण्यात आली. त्यामुळे केरळातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा का 55 लाख 74 हजार 702 वर जाऊन पोहचला आहे.