EPFO EDLI Scheme : प्रोविडंट फंड बाबत आपण नेहमी वेगवेगळ्या बातम्या वाचत असतो. बहुतांश वेळा कर्मचाऱ्यांचे लक्ष बॅलेन्स चेक करणे, फंड ट्रान्सफर करणे किंवा काढणे याकडेच असते. परंतु EPFO च्या एका खास फीचर बद्दल अनेकांनी माहिती नसते. संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना EPF खात्याचे सोबतच 7 लाखापर्यंत लाईफ इन्शुरन्स कवर मिळतो. तो देखील अगदी मोफत.
आपल्या PF खात्यासोबतच हा विमा लिंक करण्यात येतो. सर्वात विशेष गोष्ट म्हणजे आपल्या नोकरी दरम्यान कोणताही कर्मचाऱ्याला यासाठी प्रीमियम देण्याची गरज नसते. EPFO आपल्या सर्व सदस्यांना ही सुविधा देते. EPFO सदस्याचा अकस्मात मृत्यू झाल्यास नॉमिनी लाईफ इन्शुरन्सच्या रक्कमेसाठी क्लेम करू शकतो. EPFO ने ट्विट करून या फीचरबाबत माहिती दिली आहे.
EDLIs अंतर्गत मिळतो विमा
EPFO च्या इम्प्लॉई डिपॉजिट लिंक्ड इन्शुरन्स स्कीम अंतर्गत या विम्याची सुविधा मिळते. या योजनेअंतर्गत कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास नॉमिनीला कमाल 7 लाख रुपयांपर्यंतचा इन्शुरन्स कवर मिळतो. याआधी याची मर्यादा 3,60,000 रुपये इतकी होती. नंतर इन्शुरन्स कवर लिमिट 6 लाखापर्यंत वाढवण्यात आली. गेल्यावर्षी ही मर्यादा पुन्हा 7 लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे.
Salient Features of Employees's Deposit Linked Insurance (EDLI) Scheme, 1976.#EPFO #SocialSecurity #PF #Employees #ईपीएफओ #पीएफ #service pic.twitter.com/lYvNoxF1h5
— EPFO (@socialepfo) July 29, 2021
विम्याची रक्कम कशी निश्चित होते.
कोणत्याही कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर नॉमिनीला मागिल 12 महिन्याची सरारसरी पगाराच्या 30 पट रक्कम, 20 टक्के बोनससह मिळते. याचा अर्थ सध्याच्या काळात 15000 रुपयांची बेसिक इनकमवर 30x₹15,000= ₹4,50,000 त्याशिवाय बोनस रक्कम 2,50,000 सुद्धा क्ले करणाऱ्यांना मिळू शकते.
कसा करायचा क्लेम
पीएफ खातेधारकाच्या मृत्यू नंतर नॉमिनी इन्शुरन्सच्या रक्कमेसाठी क्लेम करू शकते. यासाठी इन्शुरन्स कंपनीला डेथ सर्टिफिकेट, सक्शेशन सर्टिफिकेट आणि बँक डिटेल्स देण्याची गरज असेल. इन्शुरन्स कवर मिळण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या कंपनीकडे फॉर्म जमा करावा त्यानंतर कंपनीने सत्यापित केल्यानंतर इन्शुरन्सची रक्कम प्राप्त होते.
पीएफ खात्याच्या या इन्शुरन्सचा दावा तेव्हाच केला जाऊ शकतो जेव्हा पीएफ खातेधारकाचा मृत्यू नोकरीच्या दरम्यान झाला असेल. निवृत्ती नंतर इन्शुरन्स साठी क्लेम करता येत नाही.