EPFO : पीएफधारकांसाठी गूड न्यूज, 'या' तारखेला खात्यात जमा होणार व्याज

सरकारकडून लवकरच पीएफ ​​खातेधारकांच्या खात्यात 2022 या आर्थिक वर्षाचं व्याज जमा करण्यात येणार आहे.  

Updated: Jul 5, 2022, 08:41 PM IST
EPFO : पीएफधारकांसाठी गूड न्यूज, 'या' तारखेला खात्यात जमा होणार व्याज title=

Employees Provident Fund : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पीएफधारकांसाठी महत्तावाची बातमी आहे.  7 कोटी पीएफधारकांसाठी (Employees Provident Fund) मोठी गूड न्यूज आहे. सरकारकडून लवकरच पीएफ ​​खातेधारकांच्या खात्यात 2022 या आर्थिक वर्षाचं व्याज जमा करण्यात येणार आहे. (epfo interest money will come in your PF account on this date know how to check balance)
 
यावेळी 8.1 टक्के दराने व्याज मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने आर्थिक वर्ष 2022 मध्ये पीएफ खात्यावर मिळालेल्या व्याजाची गणना केली आहे. लवकरच व्याजाची रक्कम खातेदारांच्या खात्यात पाठवण्यात येणार आहे. यावेळी सरकारच्या खात्यात जमा झालेले एकूण 72,000 कोटी रुपये पीएफधारकांच्या खात्यात पाठवण्यात येणार आहे.

रक्कम खात्यात केव्हा येणार?

पीएफ खातेधारकांना गेल्या वर्षी व्याजासाठी 6 ते 8 महिने प्रतीक्षा करावी लागली होती. कोरोनामुळे गेल्या वर्षी परिस्थिती वेगळी होती. मात्र यंदा सरकारकडून व्याज पाठवण्यासाठी चालढकल होणार नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 15 जुलैपर्यंत व्याजाचे पैसे खात्यात ट्रान्सफर केले जाऊ शकतात. या वर्षीचे व्याज 40 वर्षांतील निच्चांकी पातळीवर आहे.

Missed Call द्वारे जाणून घ्या खात्यातील रक्कम 

पीएफ धारकांना Missed Call द्वारे  आपल्या खात्यात किती रक्कम आहे, हे जाणून घेता येतं. त्यासाठी खातेधारकांना रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरुन  011-22901406 मिस्ड कॉल द्यावा लागेल. यानंतर EPFO कडून एक मेसेज प्राप्त होईल. या मेसेजमध्ये तुम्हाला खात्यातील रक्कम किती आहे, याबाबत माहिती मिळेल.