PF खात्यातून पैसे काढणे झालं सोपं; घर बसल्या काढू शकतात 1 लाख रुपये, जाणून घ्या प्रोसेस

केंद्र सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे

Updated: Oct 10, 2021, 01:45 PM IST
PF खात्यातून पैसे काढणे झालं सोपं; घर बसल्या काढू शकतात 1 लाख रुपये, जाणून घ्या प्रोसेस title=

मुंबई : कोरोना संसर्गाच्या दरम्यान अनेकांवर संकटजन्य परिस्थिती ओढावली होती. दरम्यान मेडिकल एमरजेंन्सीमुळे लोकांना आपली सेविंग्स खर्च करावी लागली होती. ज्यामुळे केंद्र सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. आणि प्रोविडंट फंडमधून 1 लाख रुपयांपर्यंतची रक्कम काढण्याला मंजूरी दिली आहे.

नवीन सेवेनुसार कर्मचारी भविष्य निधीचा कोणीही सदस्य 1 लाख रुपये एडवांस काढू शकतो. कोणत्याही प्रकारच्या वैद्यकिय कारणांसाठी हा पैसा काढला जाऊ शकतो. जाणून घेऊ या तुम्ही पीएफ कसा काढू शकता.

आता मेडिकल बील देण्याची गरज नाही
सरकारच्या नवीन सुविधेनुसार कर्मचारी कोणत्याही मेडिकल एमरजेंन्सी साठी 1 लाख रुपयापर्यंतची रक्कम एडवांस काढू शकतात. तसेच 1 तासात पीएफचे पैसे तुम्हाला मिळू शकतात. तुम्ही रुग्णालयात भरती झाल्यानंतर क्लेमचे पैसे मिळू शकतात. खरे तर ही सुविधा आधी देखील होतीच परंतु नवीन नियमांनुसार आधी मेडिकल बील देण्याची आता गरज नाही.

असे काढता येतील पैसे
- सर्वात आधी तुम्ही epfindia.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या
- संकेतस्थळाच्या उजव्या कोपऱ्या ऑनलाईन एडवांस क्लेम पर्याय असेल.
- त्यानंतर unifiedportalmem.epfindia.gov.in/memberinterface वर क्लिक करावी
- आता ऑनलाई सर्विसेसवर जा आणि क्लेम फॉर्म 31, 19, 10सी,  आणि 10 डी भरा
- आपल्या बँकेच्या खात्याचे शेवटचे 4 अंक नोंदवा आणि वेरिफाय करावी
- Proceed to Online क्लेमवर क्लिक करा
- ड्रॉप डाऊनवरून PF एडवांस निवडा, पैसे काढण्याचे कारण नोंदवा त्यानंतर रक्कम नोंदवा. चेकची स्कॅन कॉपी अपलोड करा आणि आपला पत्ता नमूद करा
- Get Adhaar OTP वर क्लिक करा आणि मोबाईल वर येणारा OTP नमूद करा.
- आता क्लेम फाइल झालेला असेल. तसेच 1 तासानंतर  तुमच्या खात्यावर पैसे जमा होतील.