Divya Pahuja : वर्षाच्या सुरुवातीलच देशात मोठं हत्याकांड झाले आहे. 2 जानेवारी रोजी मॉडेल दिव्या पहुजाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. गुरुग्राममधील हॉटेलमध्ये हा हत्येचा थरार रंगला. हॉटेलच्या CCTV फुटेमध्ये सगळं स्पष्ट दिसतय तरी मॉडेल दिव्या पहुजाचा मृतदेह पोलिसांना सापडलेला नाही. दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी हॉटेल मालकासह 3 जणांना अटक केल्याची अपडेट सोमर आली आहे.
गुरुग्रामच्या बलदेव नगरमध्ये राहणारी दिव्या पाहुजा ही गुरुग्राममधील कुख्यात गँगस्टर संदीप गडोलीची गर्लफ्रेंड म्हणून चर्चेत होती. ज्या हॉटेलमध्ये तिची हत्या झाली त्या हॉटेलचा मालक अभिजीत आणि त्याच्या साथीदारांनी दिव्याची हत्या केल्याचा आरोप आहे. त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी अभिजीत याने साथीदारांना 10 लाख रुपये दिल्याची माहिती तपासात समोर आली आहे. तपासदरम्यान पोलिसांना हॉटेलच्या CCTV फुटेमध्ये अत्यंत महत्वाची माहिती सापडली आहे. दिव्या अभिजीत सह हॉटेलमध्ये प्रवेश करताना दिसत आहे.
2 जानेवारीला पहाटे 4:18 वाजता तीन जण हॉटेलमध्ये आले. यानंतर 2 जानेवारी रोजी रात्री 10.44 वाजता दोघे ते तिघे जण चादरीमध्ये गुंडाळलेला मृतदेह ओढून नेताना दिसत आहेत. हॉटेल बाहरे उभ्या असलेल्या निळ्या रंगाच्या BMW DD03K240 कारच्या डिकीमध्ये मृतदेह टाकून घटनास्थळावरून पळ काढल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. मात्र, अद्याप दिव्याचा मृतदेह पोलिसांच्या हाती लागलेला नाही. ताब्यात घेतलेल्या आरोपींची पोलिस कसून चौकशी करत आहेत.
गुरुग्रामच्या बलदेव नगरमध्ये राहणाऱ्या दिव्याने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली. मॉडलिंग करत असताना ती गुरुग्राममधील कुख्यात गँगस्टर संदीप गडोली याच्या संपर्कात आली. संदीप गडोलीची गर्लफ्रेंड म्हणून तिची गुरुग्राममध्ये मोठी चर्चा होती. गडोलीमुळे तिला मॉडेलिंगचे अनेक प्रोजेक्ट मिळाले मात्र, तिला आपली वेगळी ओळख निर्माण करता आली नाही. ती मॉडेलिंग सोडून गडोली याच्यासोबत पत्नी प्रमाणे राहू लागली. मात्र, त्या दोघांनी लग्न केले नव्हते. तीन चार वर्षे एकत्र राहिल्यानंतर दोघांमध्ये वाद विवाद झाल्यानंतर ते वेगळे झाले. दरम्यान, संदीप गडोलीला गुरुग्राम पोलिसांना मोस्ट वाँटेड घोषित केले. पोलिसांनी दिव्याच्या मदतीने संदीप गडोलीला अटक करण्यासाठी सापळा रचला. 2016 मध्ये मुंबईतील एका हॉटेलमध्ये गुरुग्राम पोलिसांच्या पथकाने संदीप गडोलीचा एन्काउंटर केला. याच प्रकरणात मुंबई पोलिसांनी तिला अटकही केली होती. जवळपास सात वर्ष दिव्याने कारावास भोगला. मागच्यावर्षी जून महिन्यात मुंबई उच्च न्यायालयाने तिचा जामीन मंजूर केला होता.