प्रयागराज : महंत नरेंद्र गिरी (Mahant Narendra Giri)यांच्या निधनानंतर दररोज नवीन माहिती समोर येत आहे. नुकताच एक व्हिडिओ समोर आला आहे. वाघंबरी मठात पोलीस पोहचल्यानंतर त्यांनी घेतलेला हा व्हिडिओ आहे. आयजी केपी सिंह (IG KP SINGH)याविषयी मठात राहणाऱ्या शिष्यांना विचारपूस करताना दिसत आहेत.
वायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये बलवीर गिरी दिसून येत आहेत. ज्यांचा उल्लेख महंत नरेंद्र गिरी यांच्या कथित आत्महत्येच्या पत्रात आपला उत्तराधिकारी म्हणून करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये खाटेवर पडलेले फोटो आणि सर्टिफिकिट दिसून येत आहेत.
#EXCLUSIVE : देखिए, महंत नरेंद्र गिरि के सुसाइड रूम का पहला वीडियो#MahantNarendraGiri #MahantNarendraGiriDeath
अन्य Videos यहां देखें - https://t.co/ZoADfwSi4S pic.twitter.com/nl6kuExX5c
— Zee News (@ZeeNews) September 23, 2021
व्हिडिओमध्ये पंखा सुरू असल्याचे दिसून येत आहे. पंखा ज्या कडीमध्ये अडकवण्यात येतो त्यामध्ये पिवळ्या रंगाची नायलॉनची दोरी अडकवलेली दिसून येत आहे. ज्यामुळे दोरीला महंत नरेंद्र गिरी यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला होता.
व्हिडिओमध्ये लादीवर महंतांचा मृतदेह तसेच त्यांच्या गळ्यात दोरीचा एक तुकडा अडकलेला दिसून येत आहे.
व्हिडिओ समोर आल्यानंतर एक प्रश्न हा उपस्थित होत आहे की, ज्या दोरीने महंतांनी गळफास घेतला. त्याचे तीन तुकडे कसे झाले. सर्वात पहिला हिस्सा पंख्याच्या वरील कडीत अडकलेला होता. दुसरा महंतांच्या गळ्यात आणि तिसरा खोलीतील टेबलवर ठेवलेला होता.