एकट्या भाजपला 303 जागा, एक्झिट पोलच्या आधीच पीकेंची भविष्यवाणी

Lok Sabha Elections 2024: 2024 च्या लोकसभा निवडणुकीचा निकाल हा भाजपासाठी 2019 पेक्षा जोरदार असेल, असे प्रशांत किशोर यांना वाटते.

Pravin Dabholkar | Updated: Jun 1, 2024, 05:58 PM IST
एकट्या भाजपला 303 जागा, एक्झिट पोलच्या आधीच पीकेंची भविष्यवाणी  title=
exit poll 2024

Lok Sabha Elections 2024: एक्झिट पोल 2024 जाहीर होण्यास काही तास राहिले आहेत. दरम्यान भारतातील प्रसिद्ध रणनितीकार प्रशांत किशोर यांनी निवडणुकीचा अंदाज जाहीर केलाय. आजचे शेवटच्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर सर्व वृत्त वाहिन्या 6.30 वाजल्यापासून एक्झिट पोल प्रसारित करतील. 

दरम्यान 2024 च्या लोकसभा निवडणुकीचा निकाल हा भाजपासाठी 2019 पेक्षा जोरदार असेल, असे प्रशांत किशोर यांना वाटते. माझ्या आकलनानुसार भाजप तेवढाच आकडा किंवा त्यापेक्षा जास्त आकडा गाठून पुन्हा येईल, असे प्रशांत किशोर म्हणाले.

पश्चिम आणि उत्तर भारतातील लोकसभा जागांमध्ये फारसा बदल होईल असे वाटत नाही. भारताच्या पूर्व आणि दक्षिण भागात चांगले समर्थन भाजपला मिळालंय, असे प्रशांत किशोर सांगतात. 

2019 मध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपा उत्तर आणि पश्चिम भारतातील महत्वपूर्ण विजयासह 303 जागा मिळाल्या होत्या. दरम्यान दक्षिण राज्यात भाजपच्या जागा वाढतील आणि वोट शेअरदेखील वाढेल असे प्रशांत किशोर यांनी म्हटले. 

मोदींच्या नेतृत्वाखाली भाजप पुन्हा येतेय. त्यांना मागच्या निवडणुकीप्रमाणेच आकडे मिळतील किंवा यापेक्षा चांगले प्रदर्शन करेल असे प्रशांत किशोर यांना वाटते. 

जोपर्यंत भाजपविरोधात मोठा राग किंवा जनक्षोभ नसेल तोपर्यंत मोठा बदल पाहायला मिळणार नाही, असे त्यांनी सांगितले. 

विरोधी पक्षात एकजुट आणि विश्वासू नेत्याचा अभाव असल्याची टीका त्यांनी केली. विरोधी पक्षांनी कितीही प्रयत्न केले तरी त्यांच्याकडे कोणता विश्वसनीय चेहरा नाही, अशी जनतेची धारणा आहे. त्यामुळे संख्येत कोणता मोठा बदल होणार नाही, असे प्रशांत किशोर म्हणाले.

(Desclaimer: 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या सर्व 7 टप्प्यांसाठी मतदान पूर्ण झाले असून 4 जून रोजी निकाल जाहीर होतील. त्याआधी, ZEE 24 Taas ने आपल्या दर्शकांसाठी एक मेगा एक्झिट पोल आणला आहे. या मेगा एक्झिट पोलमध्ये आम्ही देशातील अनेक मोठ्या एजन्सीचे एक्झिट पोल डेटा दाखवणार आहोत. दरम्यान झी 24 तास जी आकडेवारी दाखवेल ती वेगवेगळ्या एजन्सींच्या सर्वेक्षणातून मिळवलेली आकडेवारी आहे. ज्यासाठी 'झी 24 तास' जबाबदार नाही. हे आकडे लोकसभा निवडणुकीचे निकाल नाहीत, फक्त एक्झिट पोल आहेत.)