बिहारमध्ये बॉम्बस्फोट, दोन दहशतवादी अटकेत

बिहारमधील आरा जिल्ह्यात एक बॉम्बस्फोट झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन दहशतवाद्यांना अटक केली आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Feb 15, 2018, 10:24 AM IST
बिहारमध्ये बॉम्बस्फोट, दोन दहशतवादी अटकेत  title=

नवी दिल्ली : बिहारमधील आरा जिल्ह्यात एक बॉम्बस्फोट झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन दहशतवाद्यांना अटक केली आहे.

बॉम्ब ठेवताच स्फोट

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास संशयित दहशतवादी आरा जिल्ह्यात दाखल झाले होते. बॉम्बस्फोट घडवून आणण्यासाठी आलेल्या दहशतवाद्यांनी धर्मशाळेत बॉम्ब ठेवताच त्याचा स्फोट झाला.

तीन दहशतवाद्यांनी काढला पळ

मिळालेल्या माहितीनुसार, एक दहशतवादी जखमी झाला आहे. तर, या घटनेनंतर तीन दहशतवाद्यांनी तेथून पळ काढला. हे सर्व दहशतवादी विविध ठिकाणी बॉम्बस्फोट घडविण्यासाठी बिहारमध्ये दाखल झाले होते.

दोन दहशतवादी अटकेत

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी जखमी दहशतवाद्याला अटक करत रुग्णालयात दाखल केलं. जखमी दहशतवाद्याकडून एक पिस्तुलही पोलिसांनी जप्त केली आहे. तसेच आणखीन एका दहशतवाद्याला पोलिसांनी अटक केली आहे.

गेल्या महिन्यात बोधगया येथे बॉम्ब आढळले होते. महाबोधी मंदिर परीसरात तीन ठिकाणी बॉम्ब आढळले होते. त्याचा आणि या घटनेचा काही संबंध आहे का याचाही पोलीस तपास करत आहेत.