धक्कादायक ! अफेअर कळालं म्हणून प्रियकरानं थेट महिलेच्या मुलीलाच...

आईच्या अफेरबाबत झाली मुलीला माहिती, प्रियकराने घरात घुसून....थरारक घटना समोर 

Updated: Aug 25, 2022, 07:07 PM IST
धक्कादायक ! अफेअर कळालं म्हणून प्रियकरानं थेट महिलेच्या मुलीलाच... title=

Crime News : आईच्या बाहेरील पुरूषासोबतच्या अनैतिक संबंधांबाबत मुलीला माहिती झाल्यामुळे तिची आईच्या प्रियकराने अत्यंत क्रूरपणे अल्पवयीन मुलीची हत्या केली आहे. मृत मुलगी शिवानी ही 17 वर्षांची होती. हत्या करत पळून जाणाऱ्या आरोपी प्रियकराला गावकऱ्यांनी पकडून चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे.

काय आहे प्रकरण?  
मृत मुलगी शिवानी आई आणि आरोपी हरिश एका कंपनीमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून काम करत होते. तिथेच दोघांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. दोघांच्या अफेरबाबत महिलेच्या मुलीला समजलं. त्यानंतर यावरून शिवानी आणि हरिशमध्ये वाद झाले होते. शिवानीचे आई-वडील हे बाहेर गावी गेले होते आणि त्या दिवशी शिवानी घरी एकटी होती. 

शिवानी एकटी घरी असल्याचा फायदा घेत आरोपी हरिश घरात शिरला. तिच्या आईच्या आणि त्याच्या संबंधांवरून भांडू लागला. दोघांचं भांडण टोकाला गेलं. त्यावेळी आरोपी हरिशने जवळचा चाकू काढत शिवानीच्या गळ्यावर फिरवला. त्यानंतर जखमी अवस्थेत ती घराच्या बाहेर पळाली आणि पडली. 

शेजारच्यांनी शिवानीला रक्ताच्या थारोळ्यात पडलेली पाहताच घराकडे धाव घेतली. आरोपी पळून जाण्याच्या तयारीमध्ये होता मात्र गावकऱ्यांनी त्याला पकडत चोप दिला. चोप देऊन त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं. शिवानीला लगोलग रूग्णालयात हलवण्यात आलं मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.  पोलिसांनी आरोपी हरिशच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना दिल्लीमधील मुंडका येथील टिकरी सीमा भागातील आहे.