Hackers पासून सावधान! 'या' लिंकवर क्लिक कराल तर एका झटक्यात अकाउंट हॅक

Facebook युजर्ससाठी मोठी बातमी | तुम्हालाही आलीय का ही लिंक, चुकूनही क्लिक करू नका कारण....

Updated: May 5, 2022, 10:07 AM IST
Hackers पासून सावधान! 'या' लिंकवर क्लिक कराल तर एका झटक्यात अकाउंट हॅक title=

मुंबई : तुम्ही फेसबुकवर जास्त वेळ घालवता का? तुम्हाला येणाऱ्या प्रत्येक लिंकवर तुम्ही क्लीक करता का? तर आताच सावध व्हा कारण तुमचं अकाउंट हॅक होण्याचा धोका आहे. आता एक नवा ईमेल फिशिंग घोटाळा उघडकीस आला आहे. यामध्ये एक फेक ई-मेल पाठला जातो. त्यावर तुम्ही क्लीक केलं की तुमचं खातं हॅक होतं. 

या लिंकद्वारे युजर्सची माहिती चोरण्याचा डाव हॅकर्सनी शोधला आहे. सिक्योरिटी रिसर्चर्सनी एक नवा अहवाल सादर केला आहे. या अहवालात एक धक्कादायक माहिती समोर आली. 

तुम्हाला जर असा काही मेल आला की तुमचं खातं बंद करण्यात आलं आहे किंवा ब्लॉक केलं आहे तर त्यावर विश्वास ठेवू नका. तुम्हाला एक लिंक पाठवण्यात आली असेल त्यावर क्लीक करायला सांगितलं जाईल तिथे तर चुकूनही क्लीक करू नका. 

अहवालानुसार तुमचे पासवर्ड, बर्थ डेट आणि इतर माहिती मिळवण्यासाठी अशा काही गोष्टींचा वापर करून हॅकर्स तुमची माहिती चोरण्याचा प्रयत्न करत आहेत. एवढंच नाही तर फेसबुक पेजला देखील हॅकर्सनी टार्गेट केलं आहे. 

फिशिंग घोटाळा नेमका काय? 
रिपोर्टनुसार हॅकर्स पहिल्यांदा  'द फेसबुक टीम' असल्याचा दावा करतात. तुम्ही कम्युनिटी गाइलाईनचं उल्लंघन केल्या दावा करतात. ते तुम्हाला एक लिंक पाठवतात आणि त्यावर जाऊन तुम्हाला क्लीक करायला सांगतात. तुम्ही या सगळ्या गोष्टीमध्ये फसलात  

तुम्ही चुकून त्यांनी दिलेल्या लिंकवर क्लीक केल तर तुमचा सगळा डेटा चोरला जाऊ शकतो. तुमची माहिती कुठेही देऊ नका. अशा कोणत्या लिंक तुम्हाला आल्या तर चुकूनही लिंक करू नका.