तेलंगाणा : बातमी आहे तुम्हाला सावध करणारी. सलूनमध्ये हेअर वॉश (Hair Wash) करत असाल तर ही बातमी पाहा आणि सावध व्हा. कारण स्ट्रोक (Stroke) येण्याची भीती आहे. अशीच एक घटना घडलीय. ब्यूटी पार्लरमध्ये महिलेला हेअर वॉश करताना स्ट्रोक आलाय. असं काय घडलं या महिलेसोबत? (fact check viral polkhol beauty parlour stroke woman after hair wash in salon at hyderabad)
सलूनमध्ये हेयर वॉश करताय तर सावध व्हा. कारण पार्लरमध्ये हेअर वॉश ट्रिटमेंट करताना ब्यूटी पार्लर स्ट्रोक येऊ शकतो. अशीच एक धक्कादायक घटना समोर आल्याने खळबळ उडालीय. एक 50 वर्षांची महिला ब्यूटी पार्लरमध्ये ट्रिटमेंटसाठी गेली होती. केस कापल्यानंतर ते धुत असताना तिला अचानक अस्वस्थ वाटू लागलं. तातडीने तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. त्यावेळी तिला ब्युटी पार्लर स्ट्रोक आल्याचं समोर आलं. ही घटना हैद्राबादमध्ये घडलीय. पण, हा स्ट्रोक येण्याची काय कारणं असू शकतात. हे आम्ही डॉक्टरांकडून जाणून घेतलं.
ब्यूटी पार्लरमध्ये मान बेसिनच्या दिशेनं वाकल्यामुळे स्ट्रोक आला. मानेमध्ये दोन प्रमुख रक्तवाहिन्या असतात. जास्तवेळ मान मागे टेकवल्याने मेंदूला रक्तपुरवठा होत नाही. रक्तपुरवठा कमी झाल्याने रक्ताची गुठळी होऊन स्ट्रोक येतो.
केस धुतल्यानंतर केस सुकवण्यासाठी मान मागे बेसिनला टेकवली जाते. याचवेळी रक्तवाहिन्यांमध्ये दबाव आला तर शरीराला रक्तपुरवठा कमी जास्त प्रमाणात होऊन स्ट्रोक येण्याची भीती असते. त्यामुळे पोझिशन बदलत राहायला हवं. नाहीतर सुंदर दिसण्याच्या नादात जीव गमावण्याची वेळ येईल.