Fact Check | आला अंगावर घेतलं शिंगावर, बाहुबलीच्या वळूशी मस्ती महागात पडली

तुम्ही बाहुबली चित्रपट पाहिला असेल तर ही बातमी पाहून तुम्हालाही बाहुबली आठवेल.

Updated: May 6, 2022, 10:21 PM IST
Fact Check | आला अंगावर घेतलं शिंगावर, बाहुबलीच्या वळूशी मस्ती महागात पडली title=

मुंबई :  तुम्ही बाहुबली चित्रपट पाहिला असेल तर ही बातमी पाहून तुम्हालाही बाहुबली आठवेल. अशाच एका फायर वळूशी मस्ती करणं व्यक्तीला चांगलंच महागात पडलंय. वळूनं थेट या व्यक्तीला आसमानच दाखवलं. नक्की काय आहे हा प्रकार चला पाहुयात. (fact check viral polkhol bull fight with man video viral on social media)

या वळूला पाहून त्याच्या समोर जायची कुणाचीही हिंमत होणार नाही. पण, या व्यक्तीनं या फायर वळूच्या समोर जाण्याचं धाडसं केलं आणि पुरता फसला. फसलाच नाही तर या वळूकडून बेदम मारही खाल्ला. आता बघा, फायर वळूला ही व्यक्ती कशी डिवचतेय. 

वळूनं आधी याचा नखरा पाहिला आणि बरोब्बर त्याच्यावर निशाणा साधला. हा वळू इतक्या जोरात धावत गेला की या व्यक्तीला पायऱ्या चढून पळायचीही संधी दिली नाही. या फायर वळून याला थेट आसमानच दाखवलं. 

बनियानवर असलेली ही व्यक्ती वळूला आपल्याकडे बोलावत होती. याने या वळूला हलक्यात घेतलं. पण, चिडलेल्या वळूनं याला उचलून फेकलं. आता पुन्हा एकदा पाहा. किती भयानक प्रकार घडलाय. 

या व्यक्तीला वाटलं पायऱ्यांवरून सहज पळता येईल. पण, याचा प्लान फसला आणि डिवचलेल्या वळून फूटबॉलसारखा उडवला. हे पाहून या वळूचा इतरांनी धसका घेतला की पळताभूई थोडी झाली. 

जागा मिळेल तिकडे लोक पळत होते. तर कुणी उंच ठिकाणी चढत होतं. तर काही वळूशीच मस्ती करत होते. हा व्हिडिओ आता व्हायरल होतोय. पण, नक्की हा व्हिडिओ कुठला आहे? हा प्रकार नक्की काय आहे याची आम्ही पोलखोल केली.

व्हायरल पोलखोल

हा व्हिडिओ स्पेनमधील आहे. स्पेनमधील सोळाव्या शतकापासून ही परंपरा आहे. मेडिनसेली शहरात फायर बुल फेस्टिवलचं आयोजन केलं जातं. वळूच्या शिंगांजवळ ज्वलनशील टार बॉल्स बांधले जातात. वळूचा आगीपासून बचाव करण्याची काळजीही घेतली जाते.

वळूच्या डोक्यावर जरी आग दिसत असली तरी त्याचा वळूला धोका नाही. त्याची पुरेपुर काळजी घेतली जाते. पण, वळूच्या समोर कुणी आला आणि त्याला डिवचलं तर हा वळू त्याला स्वस्तात सोडत नाही.