दिल्लीतल्या भूकंपाचा व्हिडिओ व्हायरल?

दावा आहे की, नेपाळमध्ये भूकंप आल्याने त्याचे धक्के दिल्लीत बसले.   

Updated: Nov 30, 2022, 10:46 PM IST
दिल्लीतल्या भूकंपाचा व्हिडिओ व्हायरल? title=
प्रातिनिधिक छायाचित्र

Viral Polkhol : दिल्लीत (Delhi) मोठा भूकंप (Earthquake) झाल्याचा दावा करण्यात आलाय. असा भूकंप पुन्हा येऊ शकतो असाही दावा केल्यानं हा व्हीडिओ कुठला आहे याची आम्ही पडताळणी (Fact Check) केली. मग काय पोलखोल झाली चला पाहुयात.  (fact check viral polkhol delhi earth know what true false what true)

दावा आहे की, नेपाळमध्ये भूकंप आल्याने त्याचे धक्के दिल्लीत बसले. आणि या भूकंपात दिल्लीत खूप नुकसान झालं असा दावा करण्यात आला. तसा एक व्हिडिओही व्हायरल करण्यात आलाय.याहूनही मोठा भूकंप येऊ शकतो असाही दावा केल्यानं लोकांच्या मनात भीती निर्माण झालीय. पण, आधी या व्हिडिओत बघा, कुत्रा झोपलेला होता.त्यावेळी मागे असलेला लोखंडी गेट जोरजोरात हलतो. या आवाजाने कुत्रा खडबडून जागा होतो. एवढा जोरात भूकंप आल्याने याचे झटके दिल्लीत बसल्याचा दावा केल्यानं आम्ही याची पडताळणी केली.त्यावेळी काय पोलखोल झाली पाहुयात.

व्हायरल पोलखोल

भूकंपाचा हा व्हिडिओ फिलिपाईन्सचा आहे.  20 जानेवारी 2021 रोजी व्हिडिओ अपलोड केलेला आहे. फिलीपाईन्समध्ये 7.1 तीव्रतेचा भूकंप आला होता. व्हायरल होत असलेला व्हिडिओ दिल्लीतील नाही. लोकांची दिशाभूल करण्यासाठी लोकांच्या मनात भीती निर्माण करण्यासाठी असे व्हिडिओ व्हायरल केले जातात. त्यामुळे अशा व्हायरल व्हिडिओवर विश्वास ठेवू नका. आमच्या पडताळणीत दिल्लीत भूकंप होऊन मोठं नुकसान झाल्याचा दावा असत्य ठरला.