Fact Check : धावत्या ट्रकमधून चोरी, व्हीडिओ पाहून सगळेच हैराण

Fact Check : फक्त 17 सेकंदात चोरट्यांनी धावत्या ट्रकमधून माल लंपास केलाय. चोरीचा हा थरार कॅमेऱ्यात कैद झालाय.

Updated: Jun 1, 2022, 11:18 PM IST
Fact Check : धावत्या ट्रकमधून चोरी, व्हीडिओ पाहून सगळेच हैराण title=

मुंबई :  फक्त 17 सेकंदात चोरट्यांनी धावत्या ट्रकमधून माल लंपास केलाय. चोरीचा हा थरार कॅमेऱ्यात कैद झालाय. चोरट्यांनी कसा लंपास केला ट्रकमधून माल, हे आपण सविस्तर जाणून घेऊयात. (fact check viral polkhol theft from a speeding truck know what truth what false)

हायवेवर सुरूये जीवाशी खेळ. चालत्या ट्रकमधून चोरी करण्यासाठी हा सगळा थरार सुरूये. चोरट्यांनी 17 सेकंदात धावत्या ट्रकमधून चोरी केली आहे. बघा, हे चोरटे काय करतायत. एक जण या धावत्या ट्रकला लटकतोय. तर दुसरा चोरटा ट्रकमागून बाईकनं चाललाय. यावेळी ट्रकला लटकत असलेला हा चोरटा गोणी बाहेर काढतोय. 

चोरट्याचा हा प्रयत्न यशस्वी झाला. पण, पुढे काय घडलं ते पाहा. या चोरट्याला आता ट्रकमधून उतरायचंय. पण, ट्रक थांबण्याची वाट न पाहताच बाईकवरून आलेल्या दुसऱ्या चोरट्यानं याला उतरण्यास मदत केली. 

बघा, कसे हे चोरटे जीवाशी खेळतायत. ट्रक चालकानं ब्रेक मारला असता तर दोघेही चांगलेच धडकले असते. पण, या दोघांनी हातचलाखी करत धावत्या ट्रकमधून चोरी करून पळ काढलाय. या चोरीचा थरार कॅमेऱ्यात कैद झाला असून, व्हीडिओ व्हायरल होतोय. हा व्हिडिओ कुठला आहे ते कळू शकलं नाही. पण, पैशांसाठी माणूस कसा जीव धोक्यात घालतो हे या व्हायरल व्हिडिओमधून उघड झालंय.