पुणे : प्रसिद्ध उद्योगपती अविनाश भोसले यांची 40 कोटी रुपयांची संपत्ती अंमलबजावणी संचलनालयाकडून (ED)जप्त करण्यात आली आहे. जप्त झालेली संपत्ती नागपूर आणि पुणे परिसरातील आहे. भोसले यांच्यावर ईडीने आतापर्यंतची सर्वांत मोठी कारवाई केली आहे.
पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक अविनाश भोसले यांच्या संपत्तीवर ईडीने टाच आणली आहे. तब्बल 40.34 कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. भोसले गेल्या काही महिन्यांपासून ईडीच्या रडावर आहेत.
गेल्या काही महिन्यात भोसले यांच्या विविध संपत्तीवर ईडीने छापा टाकला होता. त्यानंतर भोसले यांनीही ईडीविरोधात न्यायालयात धाव घेतली होती. रिक्षाचालक ते रिअल इस्टेट किंग असा अविनाश भोसले यांचा प्रवास आहे. ते कॉंग्रेसनेते विश्वजित कदम यांचे सासरे आहेत.
ED has seized assets worth Rs. 40.34 Crore belonging to Avinash Bhosle and his family members under FEMA, 1999.
— ED (@dir_ed) June 21, 2021